जर्मनीत महागाईदर १०.४ टक्क्यांच्या पलीकडे

‘डिस्टॅटिस’ हे जर्मनी येथील सरकारी कार्यालय

बर्लिन (जर्मनी) – रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे अमेरिका, तसेच युरोपीय देशांनी रशियावर व्यावसायिक निर्बंध लादल्याने युरोपची आर्थिक स्थिती मोडकळीस आली आहे. फ्रान्स, इंग्लंड आदी विकसित देशांना याचा चांगलाच फटका बसत आहे. त्यातही युरोपची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीत गेल्या ३२ वर्षांत, म्हणजे पूर्व आणि पश्चिम जर्मनी यांच्या पुनर्एकत्रीकरणानंतर प्रथमच महागाईदर १०.४ टक्क्यांच्याही वर गेला आहे, अशी माहिती ‘डिस्टॅटिस’ या तेथील सरकारी कार्यालयाने दिली.

जर्मनीतील वाढती महागाई

१. ऊर्जेशी संबंधित उत्पादनांचे मोठ्या प्रमाणात वाढलेले दर, हेच यामागील प्रमुख कारण असल्याचे ‘डिस्टॅटिस’चे म्हणणे आहे.

२. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर २०२२ मध्ये ऊर्जेशी संबंधित मूल्यात ४३ टक्क्यांनी वाढ झाली असून नैसर्गिक वायूच्या मूल्यात दुप्पटीहून अधिक, म्हणजे १०९.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

३. खाद्यपदार्थांचे मूल्यही २०.३ टक्क्यांनी वधारले आहे.