आरोपी श्रीमंत आहे; म्हणून त्याला सवलत देता येऊ शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

तुम्ही श्रीमंत आहात म्हणून तुम्हाला सवलत हवी आहे; परंतु आम्ही हे करणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने एका अपघाताच्या खटल्याच्या प्रकरणात आरोपीला सुनावले.

वाळूज (संभाजीनगर) येथे ऑक्सिजन सिलिंडर उष्ण होऊन रुग्णवाहिकेत स्फोट !

रुग्णवाहिकेत ठेवलेला ‘इन्व्हर्टर’ आणि ‘बॅटरी’ यांच्याजवळ ‘शॉर्टसर्किट’ होऊन आग लागली. त्यामुळे त्याच्या बाजूला असलेला ऑक्सिजन सिलिंडर उष्ण होऊन मोठा स्फोट होऊन गाडीचे अवशेष ५० फूट लांब जाऊन पडले.

नागपूर येथे कोविड रुग्णालयातील भीषण आगीत ४ रुग्णांचा मृत्यू

यापूर्वी कोविड रुग्णालयांना लागलेल्या आगीतून प्रशासनाने ना कोणता धडा घेतला, ना उपाययोजना काढल्या. त्यामुळेच परत परत अशी आग लागत आहे. उत्तरदायी असणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !

फुरसुंगी (पुणे) येथील कचरा डेपोला १२ ते १५ एकरपर्यंत भीषण आग !

पुणे महापालिकेच्या घनकचरा प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही आग लावली असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

प्रभादेवी येथील इलेक्ट्रिक वायरच्या गोदामाला आग

वायरच्या गोदामाचा तळमजला आणि बेसमेंटमध्ये आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

एकलहरे, मंचर गावांच्या सरहद्दीवरील भूमीगत पूलनिर्मितीच्या मागणीसाठी शेतकर्‍यांचे आंदोलन !

खेड ते सिन्नर मंचर बाह्यवळण चौपदरीकरण रस्त्यावर एकलहरे आणि मंचर (ता. आंबेगाव) या २ गावांच्या सरहद्दीवर भूमीगत पूल करावा या मागणीसाठी परिसरातील शेतकर्‍यांनी २६ मार्च या दिवशी रस्त्याचे काम बंद करून आंदोलन केले

अज्ञात वाहनाच्या धडकेने सातारा पोलीस दलातील कर्मचार्‍याचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत घायाळ झालेले सातारा पोलीस दलातील कर्मचारी संग्राम शिर्के यांचा रुग्णालयात उपचार चालू असतांना मृत्यू झाला आहे. संग्राम शिर्के हे वाई येथील उपविभागीय पोलीस कार्यालयात कर्तव्यावर होते.

‘सनराईज’ कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पहाणी केली. आगीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक मृताच्या कुटुंबियांसाठी सरकारने ५ लाख रुपये घोषित केले आहेत.

पाचगणी (जिल्हा सातारा) येथे रुग्णवाहिकेची ४ वाहनांना जोरदार धडक 

रत्नागिरी येथील एका कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतदेह घेऊन ही रुग्णवाहिका पाचगणी येथे येत होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील वाहनतळावर लावलेल्या गाड्यांना रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली

लोटे (खेड) येथील घरडा केमिकल्समध्ये स्फोट : ४ जणांचा मृत्यू आणि १ जण घायाळ

गेल्या वर्षभरातील लोटे एम्.आय.डी.सी.मधील ही सहावी घटना असून तिथे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.