समृद्धी महामार्गावर अडीच मासांत ४२२ अपघात : ४७ जणांचा मृत्यू !

काही मासांपासून चालू झालेल्या समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. जानेवारी ते एप्रिल २०२३ च्या पंधरवड्यापर्यत या महामार्गावर एकूण ४२२ अपघात झाले आहेत.

सातारा येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने प्रवासी बसगाड्यांची विशेष तपासणी मोहीम !

खासगी आणि इतर बस, तसेच प्रवासी वाहने राष्ट्रीय महामार्गावर अनधिकृतपणे थांबा घेऊन प्रवासी चढ-उतार करतात. त्यामुळे इतर रस्ता उपयोग करणारे घटक यांना धोका उत्पन्न होतो.

येमेनची राजधानी साना येथे आर्थिक साहाय्य वाटपाच्या वेळी चेंगराचेंगरी : ८५ जणांचा मृत्यू, तर १०० जण घायाळ

गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्याने हवेत केलेल्या गोळीबारामुळे घडली घटना !

पिंपरी (पुणे) येथील रावेत भागात वादळी वार्‍यामुळे होर्डिंग्‍ज कोसळल्‍याने ६ जणांचा मृत्‍यू !

रावेत भागात झालेल्‍या मुसळधार पावसामुळे ‘होर्डिंग्‍ज’ कोसळून ६ जणांचा मृत्‍यू झाला असून ३ जण घायाळ झाले आहेत.

छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथील महंत कनक बिहारीदास महाराज यांचे अपघातात निधन

मध्यप्रदेशातील छिंदवाडास्थित आश्रमाचे महंत कनक बिहारीदास महाराज यांचा १७ एप्रिल या दिवशी नरसिंहपूर जिल्ह्यातील बर्मन-सागरी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.

सातारा येथील राधिका चौकातील नवीन रस्त्याला भगदाड !

निकृष्ट रस्त्यामुळे ठेकेदारावर कारवाईसाठी नागरिकांना वाट का पहावी लागते ? प्रशासनाने चौकशी करून तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे.

विश्व हिंदु परिषदेचे प्रांत मंडळाचे मार्गदर्शक सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे यांचे अपघाती निधन

विश्व हिंदु परिषदेचे प्रांत प्रमुख डॉ. सुरेशराव चिकटे यांनी सांगितले, ‘‘ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे यांनी कथा, प्रवचन या माध्यमांतून हिंदूसंघटनासाठी कार्य करून संपूर्ण आयुष्य हिंदु धर्मरक्षणासाठी वेचले. धर्मातील अशी विभूती जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी हानी झाली आहे.’’

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात : १३ जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात मृत्यू झालेल्यांना ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली आणि मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये, तर घायाळांना ५० सहस्र रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे.

टेक्सास (अमेरिका) येथील डेअरी फार्ममध्ये झालेल्या स्फोटामुळे १८ सहस्र गायींचा मृत्यू !

डेअरीमध्ये यंत्रसामग्रीच्या बिघाडामुळे हा स्फोट झाला. यामुळे तेथे आग लागली. या अपघातात एक जण गंभीररित्या घायाळही झाला आहे.

समृद्धी महामार्गावर ५६० वाहनांची पडताळणी !

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आर्.टी.ओ.) वाहन पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. ३ दिवसांत ५६० वाहनांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये ६७ वाहने अयोग्य स्थितीतील होती.