जम्मूमध्ये बस खोल दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू

जम्मू – पंजाबमधील अमृतसरहून जम्मूमधील कटरा येथे जाणारी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण घायाळ झाले आहेत. घायाळांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जम्मू जिल्ह्यातील झज्जर कोटली या भागात ही बस एका पुलावरून थेट दरीत कोसळली. माता वैष्णोदेवीला जाणारे भाविक या बसमध्ये होते कि नाही ?, हे स्पष्ट झालेले नाही. हा अपघात कशामुळे झाला ?, हे अद्याप समजू शकलेले नाही.