कोकणाला ‘वेदर डिस्कम्फर्ट’ची हवामान विभागाची चेतावणी !

अतीतापमान

रत्नागिरी – अतीतापमान, सतत पाऊस आणि त्यामुळे वाढणारी आर्द्रता यांमुळे कोकण, मुंबई, ठाणे, केरळ आणि तमिळनाडू भागाला ‘वेदर डिस्कम्फर्ट’(वेदर डिस्कम्फर्ट म्हणजे अस्वस्थता वाढावणारे वातावरण) ची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे. अशा वातावरणात काम नसेल, तर शक्यतो घराबाहेर पडू नका, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

मागील दीड महिन्यापासून राज्यातील बहुतांश भागांत कडक उन्हाळा असून अस्वस्थ करणारे वातावरण तयार झाले आहे. अतितापमान, पाऊस अन् वाढती आर्द्रता प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि कोकणात हा प्रकार अधिक होत आहे. कारण तेथे अधिक आर्द्रता आहे.
अशा वातावरणामुळे उष्माघाताचा अधिक धोका असल्याने भरपूर पाणी प्या, ताक, घरातील सरबत घ्या, असा सल्ला हवामान विभागाने यावर्षी प्रथमच दिला आहे.