रिफायनरी प्रकल्पाविषयी पसरवले जात आहेत गैरसमज

रत्नागिरी – राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण ‘एम्.आय.डी.सी.’कडून केले जाणार आहे. त्याविषयी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे, अफवा पसरवणे यांसारखी कृत्ये करणार्या ४५ लोकांवर जिल्हाबंदी, तालुका बंदी, गावबंदी अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. सामाजिक माध्यमांचा आधार घेत लोकांच्या भावना भडकावणार्या लोकांवरही लक्ष ठेवले जात आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले, ‘‘राजापूर तालुक्यात बारसू भागात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीचे एक सर्वेक्षण एम्.आय.डी.सी.कडून होणार आहे. हे सर्वेक्षण कधी चालू होईल आणि कधीपर्यंत चालेल, याविषयी आपल्याकडे माहिती नाही; मात्र या सर्वेक्षणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी कुणावरही दडपशाही केलेली नाही. ’’
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !