अयोध्येतील दीपोत्सवात शरयू नदीच्या घाटावर प्रतिदिन लावण्यात येणार ९ लाख दिवे !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथे ३ नोव्हेंबरपासून चालू होणार्‍या दीपोत्सवात प्रतिदिन शरयू नदीच्या तिरावर ९ लाख दिवे लावण्यात येणार आहेत. यासह अयोध्येतील प्राचीन मठ, मंदिरे आणि कुंड येथे ३ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत.

१. श्रीरामजन्मभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या श्रीराममंदिरामध्ये ३० सहस्र  दिव्यांची रोषणाई केली जाणार आहे, तसेच श्री रामललासमोर देशी तुपाचे ५१ दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत.

२. प्राचीन हनुमानगढीमध्ये कार्तिक कृष्ण चतुर्दशीला हनुमान जयंती साजरी करण्याची प्राचीन परंपरा आहे. मंदिराच्या गर्भगृहात देवाला सोने-चांदी आणि हिरे यांनी सजवले जाणार आहे.