लक्षद्वीपमध्ये धर्मांधांच्या विरोधामुळे ११ वर्षे रखडलेले मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते अनावरण !

मोहनदास गांधींनी आयुष्यभर मुसलमानांचे लांगूलचालन केले; मात्र तरीही मुसलमानांना त्यांचा पुतळा उभारावासा वाटत नाही, हे लक्षात घ्या ! मतपेटीसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या राजकारण्यांना ही सणसणीत चपराक होय !

लढाऊ हेलिकॉप्टर्सना लक्ष्य करून ड्रोनच्या साहाय्याने बॉम्बस्फोट !

लक्ष्य चुकल्याने लढाऊ विमाने सुरक्षित !

भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका जुलै २०२२ मध्ये कार्यान्वित होणार ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

सिंह या वेळी म्हणाले की, भारतासाठी ही युद्धनौका अभिमानास्पद असून ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यास ही युद्धनौका सज्ज असेल.

कोरोनाच्या काळात धर्म, अध्यात्म आणि रामचरितमानसचे पठण औषधाप्रमाणे लाभदायक ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करील, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

सरकारने जनतेकडून साधना करवून घ्यावी !

‘कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करील. कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी सस्वर रामचरितमानसचे पठण करणेही वरदान ठरू शकते’, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवा ! – श्रीनिवास पाटील, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

सातारा जिल्ह्यातील बहुतांश युवक सैन्यात भरती होण्यासाठी प्राधान्य देतात. त्यासाठी शारीरिक आणि बौद्धिक परिश्रम घेतात; मात्र सैन्य भरती वारंवार पुढे ढकलली जात असल्याने इच्छुक युवकांची वयोमर्यादा संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

चीनकडून भारताच्या विश्वासाला तडा ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  

भारत पुनःपुन्हा त्याच्यावर विश्‍वास कसा ठेवू शकतो ? ‘चीनवर विश्‍वास ठेवणे, हा आत्मघात असून त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे’, असेच भारतियांना शासनकर्त्यांकडून अपेक्षित आहे !

पुनश्‍च हरि ॐ !

‘हिंदु राष्ट्र’ हीच भारत आणि नेपाळ दोघांचीही सनातन ओळख आहे. आज नेपाळमधील जनतेने त्याची मागणी तीव्र करत नेली आहे आणि येत्या काळात त्याची तीव्रता वाढणार आहे. भारत आशियातील महत्त्वाचे राष्ट्र असल्याने या जनतेला भारताकडून मिळणारा पाठिंबा हा पुष्कळ साहाय्याचा ठरणार आहे. भारताकडून तो मिळेल, अशी अपेक्षा आहे.

विवाहासाठी धर्मांतर करायला लावणे मान्य करता येणार नाही ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

देशात चालू असलेल्या सामूहिक धर्मांतराच्या घटना थांबायला हव्यात. विवाहासाठी धर्मांतर करायला लावणे मान्य करता येणार नाही, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश सरकारांनी केलेल्या लव्ह जिहादविरोधी कायद्याचे समर्थन केले.

भारताच्या अंतर्गत सूत्रांवर बोलणे बंद करा !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकरी आंदोलनावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना फटकारले !