(म्हणे) ‘संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचा परिणाम भारतीय सैनिकांच्या मनावर होईल !’

चीनच्या साम्यवादी सरकारचे मुखपत्र ‘दी ग्लोबल टाईम्स’चे संतापजनक वक्तव्य

  • भारतीय सैनिकांचे मानसिक खच्चीकरण करू पहाणाऱ्या चीनने जम्मू-काश्मीर आणि लद्दाख येथील अतीथंड प्रदेशात तग धरू न शकणार्‍या स्वतःच्या सैनिकांची आधी काळजी करावी ! भारतीय सैनिक हे देशासाठी कितीही प्रतिकूल परिस्थितीत लढू शकतात, हे त्यांनी कारगिल, सियाचीन आदी अनेक भागांत यशस्वी युद्ध लढून सिद्ध करून दाखवले आहे, हे चीनने विसरू नये ! – संपादक
  • चीनच्या अशा खोड्यांना भारताने जशास तसे उत्तर द्यायला हवे, अशीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा ! – संपादक
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

नवी देहली – भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे चीन सरकारचे अधिकृत मुखपत्र ‘दी ग्लोबल टाइम्स’ने त्यावर वक्तव्य केले आहे. वृत्तपत्राने म्हटले आहे, ‘सिंह यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा परिणाम भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांच्या मनावर होईल.’

सिंघुआ विश्‍वविद्यालयातील एका महाविद्यालयाचे निर्देशक कियान फेंग यांच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्स ने लिहिले आहे, ‘भारताच्या अशा उच्चपदस्थ व्यक्तीला संसर्ग होणे यातून कोरोना महामारीची लाट आता केवळ भारतीय नागरिकच नव्हे, तर त्यांच्या सैनिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करत आहे, हे दिसून येते. विषाणूच्या प्रसारणावर अटकाव घालण्यासाठी सीमेवर सैनिकांची संख्या अल्प करावी लागेल. त्यामुळे सीमेवर अल्प संख्येने असलेल्या सैनिकांच्या मनावर दबाव निर्माण होईल.’ (भारताने सीमावरील सैन्य माघारी बोलवावे, यासाठी चीन कशा प्रकारे बनाव करत आहे, हे यातून दिसून येते. अशा चीनच्या वक्तव्यांना भारतीय भूलणार नाहीत ! – संपादक)