लक्षद्वीपमध्ये मुसलमानांची लोकसंख्या ९८ टक्के !
मोहनदास गांधींनी आयुष्यभर मुसलमानांचे लांगूलचालन केले; मात्र तरीही मुसलमानांना त्यांचा पुतळा उभारावासा वाटत नाही, हे लक्षात घ्या ! मतपेटीसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करणार्या राजकारण्यांना ही सणसणीत चपराक होय ! – संपादक
करवती (लक्षद्वीप) – मोहनदास गांधी यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते येथे गांधीजींच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावण करण्यात आले. लक्षद्वीपमध्ये गांधीजींचा उभारलेला हा पहिलाच पुतळा आहे. यापूर्वी वर्ष २०१० मध्ये लक्षद्वीपमध्ये गांधीजींच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार होते; परंतु मूर्तीपूजा मान्य नसल्याने स्थानिक धर्मांधांनी या पुतळ्याला विरोध केला होता. (गांधीवादी असल्याचा ढोल बडवणार्या काँग्रेसवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक) त्यामुळे तात्कालीन काँग्रेस सरकारने गांधी पुतळा लावण्याचे रहित केले होते. (काँग्रेसवाल्यांचे गांधीप्रेम किती भंपक आहे, हे यातून दिसून येते ! – संपादक) आता ११ वर्षांनंतर तेथे गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
लक्षद्वीपमध्ये ९८ टक्के मुसलमानांची लोकसंख्या आहे. ‘कोणत्याही पुतळ्याचे अनावरण झाल्यास त्याला फुलांनी सजवावे लागेल, तसेच त्याचा सन्मानही करावा लागेल. यामुळे शरीयत कायद्याचे उल्लंघन होणार’, असे सांगत तेथील धर्मांधांनी याचा विरोध केला होता.