मीरा रोड रेल्वेस्थानकावरील प्रकार !
मुंबई – मीरा रोड रेल्वेस्थानकावर रेल्वेच्या रुळांचा काही भाग वाकडा झाला होता. त्यातच त्यावरून एक एक्सप्रेस गेली; पण तिचे डबे हलत होते. एक्सप्रेस गेल्यावर शेजारच्या रुळांवर काम करणार्या रेल्वे कामगारांच्या ते वेळीच लक्षात आले. तसे झाले नसते, तर कदाचित मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या एक्सप्रेसनंतर मीरा रोडकडून चर्चगेटकडे जाणारी एक लोकल येत होती; मात्र कामगारांनी ती लोकल थांबवली. प्रवाशांना गाडीतून उतरवले आणि १० किमीच्या गतीने रिकामी लोकल रुळांवरून सुरळीत नेण्यात आली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. आता त्या रुळांची दुरुस्ती करण्यात येईल.