पुणे महापालिकेकडून फिरत्‍या हौदांना अद्यापही मान्‍यता नाही !

यंदाच्‍या वर्षी फिरत्‍या हौदांची आवश्‍यकता नसतांनाही प्रशासनाने शहरामध्‍ये श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरत्‍या हौदांची निविदा काढली. त्‍यासाठी १ कोटी ४२ लाख रुपयांच्‍या २ निविदा काढण्‍यात आल्‍या.

आता सरकारी शाळा कुणालाही ‘दत्तक’ घेता येणार

राज्‍यात कंत्राटदारांकडून शिक्षकांची भरती करण्‍याच्‍या निर्णयावर राज्‍यभरामध्‍ये वाद चालू आहेत. आता सरकारी शाळाही दानशूर व्‍यक्‍ती, स्‍वयंसेवी संस्‍था आणि खासगी आस्‍थापने यांना ‘दत्तक’ देण्‍याचा निर्णय मंत्रीमंडळाने नुकताच घेतला आहे.

धनगर आरक्षणासाठी पुणे-सातारा महामार्ग १ घंटा रोखून धरला !

खंडाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून आंदोलनाला प्रारंभ करण्‍यात आला. नंतर मोर्चा काढत धनगर समाज बांधव महामार्गावरती एकत्र आले आणि महामार्ग रोखून धरला.

पिंपरी-चिंचवड विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्‍णवाहिका सज्‍ज !

शास्‍त्राप्रमाणे वहात्‍या पाण्‍यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन हे पर्यावरणपूरकच आहे.

मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद बांधून तेथेच विसर्जन करण्‍याचा अट्टहास !

धर्मशास्‍त्राप्रमाणे वहात्‍या पाण्‍यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणे हे योग्‍य असतांना कृत्रिम हौद आणि मूर्तीदान मोहीम राबवून महापालिका अन् काही स्‍वयंसेवी संघटना धर्मद्रोही कृत्‍य करत आहेत. याला भक्‍तांनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध करावा.

मोशी (पुणे) येथे अवैध वास्‍तव्‍य करणार्‍या ३ बांगलादेशींना अटक !

९ मासांपूर्वी बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवल्‍याचे उघड !

डोबिमळा (जिल्‍हा पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हलाल जिहाद’विषयी मार्गदर्शन !

आंबेगाव तालुक्‍यातील डोबिमळा येथे ‘हलाल जिहाद’ (इस्‍लामनुसार जे वैध आहे ते) याविषयी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने व्‍याख्‍यान आयोजित करण्‍यात आले होते.

 पू. पंडित केशव गिंडे यांना ‘स्‍वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्‍त्रीय संगीत पुरस्‍कार’ प्रदान !

‘गानवर्धन संस्‍था पुणे’ आणि ‘तात्‍यासाहेब नातू फाऊंडेशन’ यांच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ बासरीवादक, संशोधक आणि विचारवंत पू. पंडित केशव गिंडे यांना ‘स्‍वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्‍त्रीय संगीत पुरस्‍कार’ प्रदान करण्‍यात आला.

पुणे शहर भाजपची कार्यकारिणी घोषित !

भाजपच्या शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांच्या निवडीनंतर एका मासाने पुणे शहराची कार्यकारिणी १९ सप्टेंबर या दिवशी घोषित करण्यात आली. सरचिटणीसपदी चौघांची नियुक्ती करणार असे असतांना सरचिटणीसपदी ८ जणांना निवडण्यात आलेले आहे.

तळेगाव ढमढेरे (पुणे) येथे जनावरांची अवैध वाहतूक करणार्‍या ट्रकवर कारवाई !

शिक्रापूर येथे पुणे-नगर महामार्गावर दाटीवाटीने जनावरे कोंबून वाहतूक करणार्‍या ट्रकवर शिक्रापूर पोलिसांनी १६ सप्‍टेंबर या दिवशी कारवाई केली आहे.