पावसामुळे १०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकांमध्ये पालट !

दहावीची २६ जुलै या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणारी ‘विज्ञान’ आणि ‘तंत्रज्ञान भाग २’ या विषयांची परीक्षा अतीवृष्टीमुळे होऊ शकली नाही.

पुणे शहरातील १० अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हा नोंद !

पुणे जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अनधिकृत शाळांच्या सूचीमध्ये पुणे शहरातील १४, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २५ आणि पिंपरी-चिंचवडमधील काही शाळांचा समावेश आहे.

पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार !

‘पुणे सार्वजनिक सभे’चे संस्थापक गणेश वासुदेव जोशी उपाख्य सार्वजनिक काका यांच्या तिथीनुसार जयंतीच्या निमित्ताने देण्यात येणारा ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र वामनराव प्रभुदेसाई यांना देण्यात आला.

औंध (पुणे) येथील २ कर्मचार्‍यांनी केली ट्रॅव्हल्स आस्थापनाची १ कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक !

ट्रॅव्हल्स आस्थापनाकडे ग्राहकांच्या तक्रारी आल्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये गेल्या ४ वर्षांमध्ये या दोघांनी अपहार केल्याचे निदर्शनास आले.

कामावरून काढून टाकल्याने नदीपात्रात उडी मारून तरुणाची आत्महत्या !

अन्याय झाला असल्यास अन्यायाविरुद्ध सनदशीर मार्गाने लढण्यासाठी आवश्यक ते मनोबल धर्माचरणाने मिळते. आत्महत्या करणे हिंदु धर्मशास्त्रानुसार पाप आहे, हे लक्षात घ्यावे.

देवभक्तिहून श्रेष्ठ असलेल्या गुरुभक्तीची महती सांगणारा पुणे येथील सनातनचा भक्तिमय गुरुपौर्णिमा महोत्सव !

संतांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यात ७ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा ! या महोत्सवांचे संक्षिप्त वृत्त प्रस्तुत करीत आहोत.

पुणे येथे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत !

२४ जुलैला रात्री भिडे पूल आणि टिळक पूलही पाण्याखाली गेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती आणि संगम पुलासमोरील वस्तीत पाणी गेले आहे.

पवना नदीवरील धामणे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली; गावाचा संपर्क तुटला !

मावळ परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झाले आहे. मागील २४ घंट्यांत पवना धरण परिसरात ३७४ मि.मी. पाऊस पडला आहे.

‘लवासा सिटी’त दरड कोसळून २ बंगले मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले !

स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली; पण बचाव पथकाला घटनास्थळी पोचण्यास विलंब झाला. मुळशी तालुक्यात सर्वत्र पाऊस चालू असल्यामुळे बचाव पथक अडकून पडल्याची माहिती आहे.

पुणे येथे ढगफुटीसदृश्‍य पाऊस झाल्‍यामुळे जनजीवन विस्‍कळीत !

पुण्‍यात गेल्‍या २४ घंट्यांत ३७० मि.मी. पाऊस पडला. डेक्‍कन रोड येथील पुलाची वाडी परिसरात असलेल्‍या वस्‍त्‍यांमध्‍ये मध्‍यरात्री ३ वाजता पाणी शिरल्‍याने रहिवाशांची तारांबळ उडाली.