कामावरून काढून टाकल्याने नदीपात्रात उडी मारून तरुणाची आत्महत्या !

खासगी आस्थापनातील व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – कामावरून काढून टाकल्याने तरुणाने बोपोडीतील नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून खासगी आस्थापनातील व्यवस्थापक झिशान हैदर यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. विशाल साळवी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे आहे. या घटनेच्या संदर्भात विशालची बहीण प्रीती कांबळे यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. विशाल येरवडा मधील ‘कॉमर झोन आयटी पार्क’मध्ये एका खासगी आस्थापनात कामावर होता. आस्थापनातील व्यवस्थापकाने कामगारांसमोर विशालला अपमानित केले, तसेच कामावरून काढून टाकण्याची धमकीही दिली होती. कामावरून काढून टाकल्याने विशालने नैराश्यात नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. (अन्याय झाला असल्यास अन्यायाविरुद्ध सनदशीर मार्गाने लढण्यासाठी आवश्यक ते मनोबल धर्माचरणाने मिळते. आत्महत्या करणे हिंदु धर्मशास्त्रानुसार पाप आहे, हे लक्षात घ्यावे. – संपादक) आस्थापनातील व्यवस्थापकाच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे विशालने चिठ्ठीत नमूद केले होते, असे विशालची बहीण प्रीती यांनी सांगितले. या घटनेचे पुढील अन्वेषण पोलीस निरीक्षक चोरमले करत आहेत.