पैशांच्या वादातून मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या करणे हे अराजकतेचे लक्षण आहे ! – संपादक
पुणे, ४ ऑक्टोबर – रहण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून नावलौकिक असलेल्या पुण्यात भयाण घटना घडली आहे. उसने घेतलेले पैसे फेडता न आल्याने उसने पैसे देणार्या मित्रालाच मित्राने पेट्रोल टाकून जाळले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, आरोपी मनोज कांदे याला पोलिसांनी अटक केली आहे. ८० टक्के भाजल्याने संतोष कागदे यांचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला.