एकाच वेळी ७५ गडांवर गायले राष्ट्रगीत !

‘दक्षिण कमांड नौसेना’ आणि ‘आय.एन्.एस्. शिवाजी’चा उपक्रम

पुणे, ४ ऑक्टोबर – केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. या अंतर्गत दक्षिण कमांड नौसेना आणि लोणावळा येथील ‘आय.एन्.एस्. शिवाजी’ यांच्या वतीने २ ऑक्टोबर या दिवशी एकाच वेळी ‘ऑनलाईन’ पद्धतीने ७५ गडांवर राष्ट्रगीत गायले गेले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि मोहनदास गांधी यांना या माध्यमातून मानवंदना देण्यात आली.  याशिवाय उपक्रमात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी नागरिकांना स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण याांचा संदेश दिला.