इंग्लंड आणि शारजहा येथून आलेले ५ जण कोरोनाबाधित !

गोव्यात आलेल्या प्रवाशांपैकी ५ जण कोरोनाबाधित आढळले असून त्यांच्या लाळेचे नमुने कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या चाचणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.

गोव्यात दिवसभरात ११२ कोरोनाबाधित

गोव्यात नाताळ आणि ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने पर्यटक आलेले आहेत आणि ठिकठिकाणी शेकडो मेजवान्यांचे आयोजन केले जात आहे; मात्र सर्वत्र कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे.

‘ओमिक्रॉन’च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांच्या प्रशासनाला सूचना

परदेशी नागरिकांची माहिती मिळवून ७ दिवसांनंतर पुन्हा त्यांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी करावी. त्याचबरोबर विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे.

गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने घाईघाईने रात्रीची संचारबंदी लागू करता येणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याची संख्या वाढत जात असल्यास कृती दलाची बैठक झाल्यानंतर ३ जानेवारी या दिवशी निर्बंध लावण्याविषयी निर्णय घेण्यात येईल.

पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील ‘मे. रॉयल कार्बन’च्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका ! – महेश बालदी, आमदार

पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील ‘मे. रॉयल कार्बन प्रा. लि. वानिवली’ या आस्थापनेमुळे होणार्‍या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, असा तारांकित प्रश्न आमदार महेश बालदी यांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून घेतले.

राज्यातील खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांची लूट झाल्याची आरोग्यमंत्र्यांची विधान परिषदेत स्वीकृती !

शासकीय योजना जनतेपर्यंत न पोचता जनतेलाच कसे लुबाडले जाते, याचे हे आणखी एक मोठे उदाहरण !

धर्मादाय रुग्णालयांच्या मुख्य फलकावर ‘धर्मादाय’ असा उल्लेख करण्यात यावा  आणि गरीब अन् गरजू रुग्णांसाठीच्या योजनांचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत !

आरोग्य साहाय्य समितीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये धर्मादाय आयुक्तांना निवेदन

धर्मादाय रुग्णालयांच्या मुख्य फलकावर ‘धर्मादाय’ असा उल्लेख आणि रुग्णांसाठीच्या योजनांचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत !

या मागणीचे निवेदन आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने धर्मादाय उपायुक्त यांना देण्यात आले. त्यांनी याची पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सिंधुदुर्ग विमानतळावर आलेल्या ९६ प्रवाशांपैकी एक प्रवासी कोरोनाबाधित

नव्याने संसर्ग होत असलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या प्रकाराच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. जिल्ह्यात येणार्‍या विदेशी पर्यटकांची तपासणी करण्यात येत आहे.

यजमानांच्या आजारपणाच्या कालावधीत त्यांची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

ऑक्टोबर २०२० मध्ये सौ. समिधा पालशेतकर यांचे पती श्री. संजय पालशेतकर यांच्या मेंदूचे शस्त्रकर्म झाले. त्यांच्या रुग्णाईत स्थितीमध्ये त्यांना साहाय्य करत असतांना सौ. समिधा यांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.