युरोपमधील ५० टक्के नागरिक ओमिक्रॉनने बाधित होतील ! – WHO

गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये भारतामध्ये कोरोना गतीने पसरल्याने पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांनी येनकेन प्रकारेण भारताला हिणवले. आता युरोप मरणप्राय स्थितीला आला असतांना तेथील प्रसारमाध्यमे मूग गिळून गप्प आहेत. हा त्यांचा दुटप्पीपणा आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक

लंडन – येत्या ६ ते ८ आठवड्यांत युरोपमधील ५० टक्के नागरिक ओमिक्रॉनने बाधित होतील, अशी चेतावणी जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. युरोपमध्ये ओमिक्रॉनने बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात ७० लाख रुग्ण ओमिक्रॉनने बाधित झाले. युरोपमधील एकूण लोकसंख्येपैकी १ टक्का नागरिकांना प्रति सप्ताह संसर्ग होत आहे. गेल्या दोन सप्ताहांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. अनेक युरोपीय देशांतील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ शकतो, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. हॅन्स क्लूज यांनी पत्रकार परिषदेत दिल्याचे वृत्त ‘युरोपा प्रेस न्यूज’ ने प्रसिद्ध केले आहे.