डॉ. अनिरुद्ध जोशी यांच्या ‘नाडी तरंगिणी’ या उपकरणाला पारितोषिक घोषित !

नाडी परीक्षण उपकरणाला ‘स्टार्ट अप इंडिया’चे पारितोषिक !

पुणे – भारतीय औद्योगिक विश्वात नाविन्यपूर्ण संशोधन करणार्‍या तरुण संशोधकांसाठी केंद्र सरकारने ‘स्टार्ट अप इंडिया ॲवॉर्ड’ चालू केले आहेत. कृषी, आरोग्य, व्यापार, तंत्रज्ञान, आयात-निर्यात आदी ८ क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. तरुणांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी ही योजना चालू केली आहे. यंदाचे पारितोषिक डॉ. अनिरुद्ध जोशी यांच्या ‘नाडी तरंगिणी’ या उपकरणाला मिळाले आहे.

डॉ. अनिरुद्ध जोशी

या उपकरणामुळे शरिरातील रोगाचे निदान करून उपाय सुचवण्याचे काम तांत्रिक पद्धती आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांच्या साहाय्याने संगणक अन् भ्रमणभाष यांवर बसवले जाते. डॉ. जोशी यांनी बनवलेले हे उपकरण १२ देशांत वापरले जात आहे, तसेच याच्या साहाय्याने १ लाख लोकांचे आरोग्य आणि शारीरिक पडताळणी यांची माहिती त्यांच्याकडे संकलित स्वरूपात उपलब्ध आहे.