अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग गतीने होण्यासाठी आमचा प्रयत्न ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

अतीवृष्टी होऊन नद्यांना पूर आला, तर त्याविषयी विशेष काळजी घेतली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि महसूल विभाग आतापासून दक्ष आहे. कर्नाटक राज्याच्या आपण संपर्कात आहोत.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील वीजपुरवठा तब्बल १४ दिवसांनी चालू

महावितरण आस्थापनाच्या कर्मचार्‍यांनी विजेचे खांब आणि तुटलेल्या वीजवाहिन्या पूर्ववत् करून किल्ल्यातील वीजपुरवठा पूर्ववत् केला.

ऑस्ट्रेलियाच्या सरकारने भारताकडे केली ५ सहस्र लिटर विषाची मागणी

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या उंदरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तेथे ‘बायबलीकल प्लेग’ (Biblical Plague) घोषित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने उंदराना नायनाट करण्यासाठी भारताकडून ५ सहस्र लिटर ‘ब्रॉमेडीओलोन’ विषाची मागणी केली आहे.

संभाजीनगर जिल्ह्याच्या ‘आपत्ती व्यवस्थापन कक्षा’त पुष्कळ त्रुटी !

आपत्ती व्यवस्थापन कक्ष भंगार आणि नादुरुस्त साधनसामग्रीवर अवलंबून आहे. येथे पुरेसे मनुष्यबळ नसून आगीची घटना घडल्यास या विभागाला महापालिकेच्या अग्नीशमन दलावर अवलंबून रहावे लागत आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याची मोठी हानी

चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर हानी होऊनही शासनाकडून कोणतीच नोंद न घेतली गेल्याने किल्लावासियांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

आगामी भीषण आपत्काळात आरोग्यरक्षणासाठी उपयुक्त ठरतील अशा औषधी वनस्पतींची लागवड आतापासूनच करा !

योग्य वेळी योग्य ती औषधी वनस्पती उपलब्ध होण्यासाठी ती आपल्या सभोवताली असायला हवी. यासाठी अशा औषधी वनस्पतींची लागवड आताच करून ठेवणे….

३ वर्षांपूर्वी १३ कोटी रुपये व्यय करून झारखंडमधील कांची नदीवर बांधलेला पूल चक्रीवादळाच्या तडाख्याने पडला !

यातून इंग्रजांनी भारताला जितके लुटले नाही, तितके भारतीयच भारताला लुटत आहेत, असे म्हणता येईल !

‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’च्या वतीने देवबाग येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा

कोकणातील सामाजिक संघटना, तसेच दानशूर व्यक्ती यांनी पुढे येऊन वादळामुळे हानी झालेल्या आणि आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या लोकांना साहाय्य करावे.

‘यास’ चक्रीवादळ ओडिशा आणि बंगाल यांना झोडपून झारखंडच्या दिशेने मार्गस्थ !

भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आलेले ‘यास’ नावाचे चक्रीवादळ आता झारखंडच्या दिशेने जात आहे. यापुढच्या प्रवासात वादळाचा वेग आणि तीव्रता हळूहळू कमी होत जाणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

तौक्ते चक्रीवादळातील हानीग्रस्तांना २५० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित करण्याचा राज्यशासनाचा निर्णय ! – विजय वडेट्टीवार, साहाय्य आणि पुनर्वसन मंत्री

मागील आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनार्‍यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठी हानी झाली आहे. यातील हानीग्रस्तांना राज्यशासनाने २५० कोटी रुपये इतके अर्थसाहाय्य घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे,