सिंधुदुर्ग किल्ल्यावरील वीजपुरवठा तब्बल १४ दिवसांनी चालू

मालवण – ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा संपूर्ण कोकण किनारपट्टीला बसला, तसाच तो येथील सिंधुदुर्ग किल्ल्यालाही बसला. चक्रीवादळामुळे किल्ल्यातील घरांची मोठी होनी झाली आहे, तसेच वीजवाहिन्यांचे खांब आणि झाडे उन्मळून पडल्याने वीजपुरवठा १४ दिवस बंद होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्ह्यात आलेल्या महावितरण आस्थापनाच्या इतरत्रच्या अतिरिक्त कर्मचार्‍यांनी विजेचे खांब आणि तुटलेल्या वीजवाहिन्या पूर्ववत् करून किल्ल्यातील वीजपुरवठा २९ मे या दिवशी सायंकाळी पूर्ववत् केला. वीजपुरवठा पूर्ववत् झाल्यानंतर किल्ल्यातील रहिवाशांनी महावितरणचे कर्मचारी, तसेच लोकप्रतिनिधी यांचे आभार मानले.