ऑस्ट्रेलियाच्या सरकारने भारताकडे केली ५ सहस्र लिटर विषाची मागणी

ऑस्ट्रेलियामध्ये उंदरांचा धुमाकूळ !

सिडनी (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियामध्ये सध्या उंदरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तेथे ‘बायबलीकल प्लेग’ (Biblical Plague) घोषित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने उंदराना नायनाट करण्यासाठी भारताकडून ५ सहस्र लिटर ‘ब्रॉमेडीओलोन’ विषाची मागणी केली आहे. एका अहवालानुसार उंदीर सर्वत्र आढळत आहेत. ते शेतात, घरे, छतावर, शाळा आणि रुग्णालय येथे आढळत आहेत. यामुळे लोक त्रस्त आहेत. बरेच लोक यापासून आजारी पडल्याच्या बातम्या देखील आल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील शेतकरीही उंदरांमुळे त्रस्त झाले आहेत. उंदीर त्यांचे पीक नष्ट करत आहेत. लोकांच्या अंथरुणात घुसून उंदीर लोकांना चावा घेत आहेत. एका कुटुंबाच्या घराला लागलेल्या आगीसाठी त्यांनी उंदरांना जबाबदार ठरवलं. कारण वायर चावल्याने शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली होती.

अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ – कौशिकपद्धति

अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.