पूर संरक्षक भिंतीचा निधी जलसंपदा अधिकार्‍यांनी घाईने अन्यत्र वळवू नये ! – ग्रामस्थांची मागणी !

प्रतिवर्षी कराड आणि पाटण तालुक्यातील ८१ गावे पूरग्रस्त होतात. तरीही अद्याप तेथे कोणतीही उपाययोजना केली गेलेली नाही.

गोव्यात मुसळधार पाऊस : हवामान खात्याकडून आजही मुसळधार पावसाची चेतावणी

पावसामुळे रस्ते पाण्याखाली जाणे, पुरसदृश स्थिती निर्माण होणे, पाणी किंवा वीजपुरवठ्यावर परिणाम होणे, झाडे उन्मळून पडणे, दरडी कोसळणे, पिकांची हानी आदी शक्यता आहे.

परभणी येथील लेंडी नदीला पूर आल्याने ५ गावांचा संपर्क तुटला !

१३ जूनच्या रात्री मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील लेंडी नदीला पूर आल्याने परिसरातील आरखेड, फळा, सोमेश्‍वर, घोडा, उमरथडी या ५ गावांचा संपर्क तुटला आहे. पुलावरून पाणी जात असल्याने गावकर्‍यांची ये-जा बंद झाली.

अतीवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यातील ३ गावच्या ग्रामस्थांना स्थलांतराची सूचना

६० कुटुंबांना त्यांच्या सोयीनुसार उपलब्ध असलेल्या शासकीय इमारतींमध्ये स्थलांतरित होण्याच्या नोटिसा शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या हानीची केंद्रीय पथकाकडून पहाणी

केंद्रीय पथकाने ३ जूनपासून कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची पहाणी केली.

अवकाळीच्या वादळी वार्‍यासह झालेल्या मान्सूनमुळे डाळिंब आणि केळीच्या बागा भुईसपाट !

बेदाणा भिजल्याने शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. त्याचे तातडीने पंचनामे करून त्वरित हानीभरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे हानी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार वैभव नाईक यांच्याकडून सिंधुदुर्ग किल्ल्याची पहाणी

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन पहाणी केली आणि तेथील रहिवाशांची विचारपूस केली

सलग ४ वर्षे होत आहे अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती !

हवामान बदलामुळे चक्रीवादळ निर्माण होत आहे का ? यासाठी पुढील काही काळ अभ्यास करणे आवश्यक असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. शिवानंद यांनी सांगितले.

विद्युत् कर्मचार्‍यांनी ‘तौक्ते’ चक्रीवादळात केलेले काम कौतुकास्पद ! – सौ. संजना सावंत, अध्यक्षा, जिल्हा परिषद

चक्रीवादळात हानी झालेल्या नागरिकांना पत्रे आणि ताडपत्री यांचे वाटप करण्यात आले.