जम्मू-काश्मीरमधील सरकारी कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकावण्याचा नायब राज्यपालांचा आदेश

जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांनी जम्मू-काश्मीरच्या सर्व सरकारी कार्यालयांवर येत्या १५ दिवसांत राष्ट्रध्वज फडकावण्याचा आदेश दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० असतांना तेथे लाल रंगाचा स्वतंत्र ध्वज फडकावण्यात येत असे; मात्र कलम ३७० हटवून राज्याचे विभाजन करण्यात आले.

निकाल विरोधात गेल्यावर सामाजिक माध्यमांतून न्यायाधिशांना ‘ट्रोल’ करणे चुकीचे ! – रवी शंकर प्रसाद, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री

सामाजिक माध्यमांतून न्यायाधिशांना ‘ट्रोल’ करणे, हा प्रकार चुकीचा आहे. न्याययंत्रणेला त्यांचे दायित्व पार पाडण्यासाठी पूर्णपणे मुक्त ठेवले पाहिजे.

केरळमध्ये सत्तेत आल्यास लव्ह जिहादविरोधी कायदा करू ! – राजनाथ सिंह

केंद्र सरकारने केवळ लव्ह जिहादविरोधीच नव्हे, तर धर्मांतरविरोधी, लोकसंख्या नियंत्रण, समान नागरी कायदा आदी कायदे केले पाहिजेत !

पंजाबमध्ये संतप्त शेतकर्‍यांनी भाजपच्या आमदाराला मारहाण करत कपडे फाडले !

शेतकरी आंदोलन आता समाजविघातक घटकांच्या कह्यात गेले आहे, हे लक्षात घ्या !

बंगालमध्ये भाजपच्या महिला उमेदवार आणि खासदार लॉकेट चॅटर्जी या रसायन मिश्रित रंग फेकल्याने घायाळ

बंगालमधील राजकारण किती खालच्या थराला पोचले आहे, तेथे अराजक माजल्याचे दिसून येते.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये २५ लाख लोक बाधित होणार ! – स्टेट बँकेच्या संशोधनाचा निष्कर्ष

भारतीय स्टेट बँकेच्या रिसर्च पॅनेलने ही दुसरी लाट पुष्कळ धोकादायक असण्याची भीती व्यक्त केली आहे. या दुसर्‍या लाटेत २५ लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता वर्तवली आहे.

वाहनाच्या संदर्भातील कागदपत्रांच्या नूतनीकरणाला मुदतवाढ

ज्या वाहनधारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, पीयूसी किंवा इतर कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० ला संपली आहे किंवा ३१ मार्च २०२१ या दिवशी संपणार आहे, अशांसाठी ही मुदतवाढ आहे.

मंत्री सुरेश राणा, आमदार संगीत सोम, साध्वी प्राची यांच्यासमवेत १२ नेत्यांच्या विरोधातील खटला मागे घेण्यास न्यायालयाची अनुमती !

वर्ष २०१३ च्या मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) दंगलीचे प्रकरण

पुण्यात भारत-इंग्लंड सामन्याच्या वेळी सट्टेबाजी, मैदानालगतच थाटलेला सट्टेबाजांचा अड्डा उद्ध्वस्त !

क्रिकेटच्या सामन्यांत बुकींचा सुळसुळाट असतो, असे आतापर्यंत अनेक वेळा निदर्शनास आले आहे. याचा अर्थ त्यांना कायदा-सुव्यवस्थेचा धाक उरलेला नाही, हेच दिसून येते. बुकींचा कायमस्वरूपी बंदोबस्त केव्हा करणार ?

भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना कोरोनाची लागण

सचिन यांनी याविषयी सामाजिक संकेतस्थळावर माहिती दिली.