‘वॉर्नर ब्रदर्स’ आस्थापनाच्या व्हिडिओमध्ये भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळले !

हिंदु जनजागृती समितीकडून विरोध !  

केंद्र सरकारनेही यास विरोध करून या आस्थापनावर चुकीचे मानचित्र काढून योग्य मानचित्र घेण्यासाठी दबाव निर्माण करावा !

मुंबई – ‘वॉर्नर ब्रदर्स’ या अमेरिकेतील चित्रपट निर्मिती करणार्‍या आस्थापनाकडून लहान मुलांच्या शिक्षणाविषयी व्हिडिओही बनवले जातात. अशाच एका व्हिडिओमध्ये भारताच्या मानचित्राचा अवमान करण्यात आला आहे. या आस्थापनाच्या अधिकृत ‘यूट्यूब चॅनल’वर असलेल्या या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग वगळण्यात आला आहे. याची माहिती हिंदु जनजागृती समितीला एका राष्ट्रप्रेमीने दिल्यावर समितीने ‘वॉर्नर ब्रदर्स’कडे ट्वीटद्वारे भारताचे योग्य मानचित्र घेण्याची मागणी केली आहे. तसेच ‘सामाजिक माध्यमांतून राष्ट्रप्रेमींनी याविषयी ई-मेल आणि ट्वीट करून वैध मार्गाने विरोध करावा’, असे आवाहनही केले आहे. समितीने केलेल्या मागणीवर ‘वॉर्नर ब्रदर्स’चे अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.

राष्ट्रप्रेमी पुढील संपर्कावर निषेध नोंदवत आहेत.  

ट्विटर : twitter.com/Warnerbros  
इमेल : [email protected]