पुत्तूरू (कर्नाटक) येथे धर्मांधाकडून दुकानात घुसून तरुणीचा विनयभंग

प्रतिकात्मक छायाचित्र

पुत्तूरू (कर्नाटक) – कर्नाटक आणि केरळ राज्यांच्या सीमेवर असलेल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील नेट्टणिगे मुड्नुरू गावातील ६० वर्षांच्या इब्राहिम कुक्काजे याने औषधांच्या दुकानात घुसून महिला कर्मचार्‍याचा विनयभंग केला. या वेळी तरुणीने आरडाओरड केल्यावर लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. (अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हात, पाय तोडण्याच्या किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याच्या शिक्षेची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक)