उत्तरप्रदेशमधील भाजप शासनाकडून लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा मसुदा सिद्ध !

१ मूल असणार्‍यांना विशेष सुविधा, तर २ पेक्षा अधिक मुले असणार्‍यांना सरकारी योजनांचा लाभ नाही !

गोपनियतेचा भंग केल्याच्या प्रकरणी ‘ट्रू कॉलर’च्या विरोधात याचिका

‘ट्रू कॉलर’ या ‘मोबाईल ॲप’ वापरकर्त्यांची माहिती इतर ठिकाणी ‘शेअर’ केली असून त्यांनी गोपनीयतेच्या कायद्याचा आणि ‘टेडा प्रायव्हसी’चा भंग केला असल्याचा दावा एका याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे.

भगवान जगन्नाथाच्या १४४ व्या रथयात्रेस गुजरात शासनाची संमती

गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा म्हणाले की, कोरोनामुळे मागील वर्षी रथयात्रा रहित केली होती. आता राज्यातील कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्यामुळे कोरोना निर्बंधांचे पालन करत रथयात्रा काढण्यात येईल.

देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता असल्याने केंद्रशासनाने प्रयत्न करावेत ! – देहली उच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयानेही यापूर्वी अशा प्रकारची सूचना केंद्रशासनाला केली आहे; मात्र त्यावर कोणत्याही पक्षाच्या शासनकर्त्यांनी प्रयत्न केलेले नाहीत. आता केंद्रातील भाजप शासन यासाठी प्रयत्न करील, अशी हिंदूंना अपेक्षा आहे !

WhatsApp च्या गोपनीयतेच्या धोरणावर आम्ही सध्या स्वेच्छेने बंदी घातली आहे ! – WhatsApp ची देहली उच्च न्यायालयात माहिती

यातून व्हॉट्सअ‍ॅपचा उद्दामपणा दिसून येतो ! ‘व्हॉट्सअ‍ॅपच्या गोपनीयतेच्या धोरणावर सरकारने आक्षेप घेतला असून तो आम्ही परेच्छेने तात्पुरता मान्य करत आहोत’, असेच या आस्थापनाला यातून सुचवायचे आहे !

काश्मीरमध्ये २ पाकिस्तानी आतंकवादी ठार, तर २ सैनिक हुतात्मा

एका सैनिकाच्या बदल्यात पाकचे १०० सैनिक जोपर्यंत ठार केले जात नाहीत, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !

वक्तशीर रहा, आधीच्या मंत्र्यांशी चर्चा करा, न थकता काम करा !

वक्तशीर रहा, आधीच्या मंत्र्यांशी चर्चा आणि न थकता काम करा, अशी त्रिसूत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन नियुक्त झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत त्यांना सांगितली. या सर्व नवीन मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही बैठक घेण्यात आली.

श्रीरामजन्मभूमी आंदोलनात प्राणत्याग केलेल्या कारसेवकांच्या घरापर्यंत रस्ता बनवून त्यांना त्यांची नावे देणार !  

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची घोषणा !

संभल (उत्तरप्रदेश) येथे एका साधूची निर्घृण हत्या !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशमध्ये सत्तेत असतांना हिंदूंना तेथे संत-महंतांच्या हत्या होणे अपेक्षित नाही !