भगवान जगन्नाथाच्या १४४ व्या रथयात्रेस गुजरात शासनाची संमती

भगवान जगन्नाथ रथयात्रा

कर्णावती (गुजरात) – येथील भगवान जगन्नाथाच्या १४४ व्या पारंपरिक रथयात्रेला शासनाकडून अनुमती देण्यात आली आहे. या वेळी संचारबंदी असणार आहे.  यात्रेत केवळ ३ रथ आणि २ वाहने असतील. १९ किमी मार्गासाठी रथयात्रेला अनुमती देण्यात आली आहे. रथयात्रेमध्ये प्रसाद वाटप होणार नाही. गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा म्हणाले की, कोरोनामुळे मागील वर्षी रथयात्रा रहित केली होती. आता राज्यातील कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्यामुळे कोरोना निर्बंधांचे पालन करत रथयात्रा काढण्यात येईल. भाविक दूरदर्शन आणि अन्य दूरचित्रवाहिन्या यांवरून रथयात्रेचे दर्शन घेऊ शकतात.