प्रखर हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशमध्ये सत्तेत असतांना हिंदूंना तेथे संत-महंतांच्या हत्या होणे अपेक्षित नाही ! संत-महंतांच्या हत्या रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने कठोरात कठोर पावले उचलणे अपेक्षित !

संभल (उत्तरप्रदेश) – येथील झारखंडी मंदिराच्या एका महंतांची निर्घृण हत्या करण्यात आली. भरत गिरी असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोनू वाल्मीकि नावाच्या युवकास अटक केली असून त्याच्याकडून शस्त्र हस्तगत करण्यात आले आहे.
सौजन्य : mera sambhal
पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी सांगितले, ‘९ जुलैला सकाळी या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महंतांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. न्यायवैद्यक (फॉरेंसिक) तज्ञ आणि श्वानपथक यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अधिक चौकशी केली असता महंत भरत यांची २ दिवसांपूर्वी एका युवकाशी वादावादी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या दिशेने अन्वेषण केल्यानंतर पोलिसांनी मोनू याला अटक केली. पोलीस चौकशीत मोनूने ‘महंत भरत हे माझी अपकीर्ती करत होते आणि त्याचा राग मनात धरून ८ जुलैला रात्री एका लोखंडी रॉडने मी महंतांची हत्या केली’, अशी स्वीकृती दिली. महंत भरत हे मूळचे वाराणसी येथील होते. मागील ८ वर्षांपासून ते संभल जिल्ह्यातील गुमसानी गावातील झारखंडी मंदिरात रहात होते.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !