‘‘तुम्ही आमचा अपमान करत आहात !’’ – खासदार संजय राऊत यांची राज्यपालांवर टीका

विधान परिषदेत १२ राज्यपालनियुक्त सदस्यांची निवड करण्यासाठी राज्यशासनाने मागील वर्षी १२ सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह यांच्याकडे पाठवली आहेत; मात्र राज्यपालांनी ती अद्याप संमत केलेली नाहीत.

मुंबईत लोकल रेल्वेने अधिवक्त्यांना प्रवासाची अनुमती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

लोकलमध्ये गर्दी झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने राज्यशासनाने निर्बंध ठेवले आहेत, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने लोकल रेल्वेगाड्यांमधून अधिवक्त्यांना प्रवास करण्याची अनुमती नाकारली आहे.

‘दक्षिण मुंबई कॅटरिंग  असोशिएशन’कडून ‘२ घास पोटासाठी’ उपक्रमाद्वारे अन्नवाटप !

कोरोनाच्या कालावधीत हातावर पोट असणारे नागरिक उपाशी राहू नयेत, यासाठी ‘दक्षिण मुंबई कॅटरिंग असोशिएशन’ या संस्थेच्या वतीने काळाचौकी आणि शिवडी येथील कामगार विभागात ‘दोन घास पोटासाठी’ हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे.

कोरोनावरील लसीच्या पुरवठ्यासाठी मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या जागतिक निविदेला ४ जणांचा प्रतिसाद !

लसीच्या तुटवड्यामुळे मुंबई महानगरपालिकेने कोरोनावरील लसीचा पुरवठा करण्यासाठी काढलेल्या जागतिक  निविदांना केवळ ४ जणांकडून प्रतिसाद मिळाला आहे; पण या चारही जणांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही.

शासनाने पीडितांना तातडीने भरघोस हानीभरपाई द्यावी ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी शासनाने काही घोषणा केल्या होत्या; मात्र त्याची हानीभरपाई अद्याप मिळालेली नाही. आता वर्षभरातच या नागरिकांना दुसरा फटका बसला आहे. शासनाने पीडितांना तातडीने हानीभरपाई द्यायला हवी, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …..

‘म्युकरमायकोसिस’मुळे महाराष्ट्रातील ९० जणांचा मृत्यू !

‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य रोगामुळे आतापर्यंत राज्यातील ९० जणांचा मृत्यू झाला आहे. यासाठी लागणारा व्यय शासन देणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून यावरील उपचारांचा व्यय दिला जाईल.

श्रीमंत भिकारी ?

कोट्यधीश असणारे अनेक भिकारी मुंबईत असणे, हे मुंबईचे वैशिष्ट्य म्हणायचे का ? असे असले तरी भीक मागणारे, त्यांना भीक देणारे आणि सरकार या सर्वांसाठी हे शरमेने मान खाली घालायला लावणारेच आहे.

पंतप्रधान निधीतून महाराष्ट्राला मिळालेल्या ४ सहस्र ४२७ पैकी ८७५ ‘व्हेंटिलेटर्स’ दुरुस्तीच्या कारणास्तव पडून !

‘व्हेंटिलेटर्स’च्या अभावामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण जात असतांना नादुरुस्त ‘व्हेंटिलेटर्स’ दुरुस्त करण्याविषयी प्रशासनाची उदासीनता अक्षम्य आहे. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होऊन दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

चक्रीवादळानंतर मुंबई येथे अरबी समुद्रात ४ जहाजे अडकली !

लोकहो, अशा संकटांपासून कोणतीही सरकारी यंत्रणा नाही, तर ‘देवच वाचवील’, या श्रद्धेने साधना कराल, तरच सर्वच संकटांतूनही वाचाल !

पोलीसदलाची प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी सर्वसामान्य पोलीसच खरा कणा !

महाराष्ट्रातात अलीकडे घडलेल्या काही घटनांमुळे मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस दलाविषयी काही प्रश्‍नचिन्ह उभे राहिले असले, तरी हे सावट पोलीसदलालाच प्रामाणिकपणे प्रयत्न करून दूर करावे लागेल. तसेच एक-दोन घटनांमुळे पोलीसदलाला सरसकट दोषी ठरवणेही योग्य नाही.