सक्तवसुली संचालनालयाकडून अनिल देशमुख यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद !

१०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा नोंद केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचा आरोप केला आहे.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे बडतर्फ !

प्रसिद्धी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या जवळ स्फोटकासाठी वापलेल्या जाणार्‍या जिलेटीनच्या कांड्या आढळल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर मुंबई पोलीस दलाने बडतर्फीची कारवाई केली आहे.

परराज्यातील लोक महाराष्ट्रात लसीकरणासाठी येत असल्याचे उघड ! – बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

कोविन अ‍ॅपद्वारे नोंदणी करून परराज्यातील लोक महाराष्ट्रामध्ये लसीकरणासाठी येत असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोरोनामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली !

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परिपत्रक काढले आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून याविषयीची माहिती दिली.

लवकरच पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेऊन मराठा आरक्षणासाठी विनंती करणार ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आरक्षणाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपती आणि केंद्रशासन यांचा आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रपतींना आमच्या भावना पत्राच्या स्वरूपात पोचवण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली.

१५ मे या दिवशी चक्रीवादळाची शक्यता !

दक्षिण अरबी समुद्रात १५ मे या दिवशी चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून अनेक राज्यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत असून ते पुढे उत्तर पश्‍चिमेला ……

लसींच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वर्षे वयोगटाच्या लसी ४५ वर्षे वयोगटावरील व्यक्तींसाठी वापरणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

महाराष्ट्रात ४५ वर्षे आणि त्यापुढील, तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरण चालू आहे; मात्र लसींच्या मागणीप्रमाणे त्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरण मंदावण्याची शक्यता आहे; कारण या वयोगटासाठीच्या लसी ४५ वर्षे वयोगटापुढील नागरिकांना….

गाड्या बळजोरीने नेणार्‍या पोलिसांच्या विरोधात तक्रार नोंदवली जात नसल्याचा आरोप !

‘मला ‘मनसुख हिरेन’ व्हायचे नाही’, असे म्हणत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथिमीरे यांच्या विरोधात तक्रार करणार्‍या व्यक्तीची तक्रार वसई पोलीस ठाण्यात नोंदवून घेतली जात नसल्याचा आरोप….

दळणवळण बंदीच्या काळात राज्य सरकारच्या धोरणावर टीका करणार्‍या महिलेवरील गुन्हा रहित !

गेल्या वर्षी दळणवळण बंदीच्या काळात राज्य सरकारच्या कोरोना हाताळण्याच्या धोरणाविषयी  नवी मुंबईतील सुनैना होले या महिलेने टीका केली होती. या प्रकरणी महिलेवर मुंबईच्या सायबर विभागाने नोंद केलेला केलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने ५ मे या दिवशी रहित केला.

आरोग्य विभागातील १६ सहस्र पदे तातडीने भरणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य सुविधा हा महत्त्वाचा घटक झाला आहे; मात्र राज्यात अनेक ठिकाणी आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहेत. अशा १६ सहस्र पदांची तातडीने भरती केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ६ मे या दिवशी पत्रकारांना दिली.