अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विधीमंडळात संघर्ष करू ! – देवेंद्र फडणवीस

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारी पक्षाकडून आयोजित करण्यात येणार्‍या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली.

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांची सुटका नाहीच !

अंमलबजावणी संचालनालयाने दाऊद इब्राहिम याच्या आर्थिक गैरव्यवहाराची पडताळणी चालू केली आहे. या प्रकरणी  पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) कायद्याच्या अंतर्गत मलिक यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्या १२ हून अधिक शेल आस्थापना असल्याचे उघडकीस !

आस्थापना कायद्यानुसार या आस्थापनांमध्ये काही त्रुटीदेखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते ! – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

नवाब मलिकांचा मुलगा फराझ यालाही समन्स !

दाऊद इब्राहीम टोळी, क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने त्यांच्या विरोधात समन्स बजावले आहेत.

‘सॅफ्रॉन थिंक टँक’ या मुंबईस्थित हिंदु संघटनेच्या समान नागरी कायद्याची मागणी करणार्‍या ‘ऑनलाईन’ स्वाक्षरी मोहिमेला दीड लाख लोकांचा प्रतिसाद !

लग्न आणि घटस्फोट याविषयी विविध कायद्यांमधल्या वेगवेगळ्या तरतुदींमुळे वाद निर्माण होत असून ते संपुष्टात आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समान नागरी कायदा लागू करणे आवश्यक आहे.

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती !

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी पोलीस आयुक्त पदावर असलेले हेमंत नगराळे यांचे राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी स्थानांतर करण्यात आले आहे.

नवी मुंबईतील भूमीपुत्रांनी २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बांधलेली घरे नियमित होणार ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

एकनाथ शिंदे म्हणाले की, या निर्णयामध्ये वर्ष १९७० गावठाणांच्या हद्दीपासून विस्तारीत गावठाणांची हद्द २५० मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या क्षेत्रातील सर्वच गरजेपोटी बांधलेली घरे नियमित होणार आहेत.

चाणक्याविना चंद्रगुप्ताला आणि समर्थांविना शिवाजीला कोण विचारेल ? – राज्यपाल कोश्यारी

महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याविना चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांविना शिवाजीला कोण विचारेल ? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचे मोठे योगदान असते, तसेच आपल्या समाजात गुरूंचे मोठे स्थान असते.

राज्यशासनाने मागण्या मान्य केल्याने खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे आमरण उपोषण स्थगित !

मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या अन्य काही मागण्या यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ३ दिवसांपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला प्रारंभ केला होता. राज्यशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतले.