रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते ! – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

रामदास आठवले

मुंबई – रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते. त्यांना त्यांचे मार्गदर्शन होत होते. त्यांना त्यांची प्रेरणा होती, ही गोष्ट खरी आहे. राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही. राज्यपालांनी काय वक्तव्य केले आहे, ते तपासून पहाणे आवश्यक आहे. राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ते पिंपरी येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या निमित्ताने आले होते, त्या वेळी बोलत होते. पिंपरीत भाजपचा महापौर झाला, तर आमचा उपमहापौर झाला पाहिजे, असेही ते या वेळी म्हणाले.


पू. संभाजीराव भिडेगुरुजी

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळण्याअगोदर समाजाची जशी स्थिती होती, तशी स्थिती आजही आहे. निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर !’ – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान