राज्यात दहीहंडी उत्साहात साजरी !

आम्ही दीड मासापूर्वीच बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ‘हंडी फोडली’ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना वाढीव अनुदान देण्याविषयी २३ ऑगस्टला बैठक घेऊ ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

हा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे. विनाअनुदानित शाळांना २० टक्के वाढीव अनुदान देण्याविषयी लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी मागणी करत आहेत.

राज्यातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या शिक्षण सेवक पदाच्या मानधनात वाढ करावी या मागणीनुसार मानधन देण्याविषयी धोरण ठरवण्यात येत आहे.

अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित !

असे पोलीस असणे पोलीस दलाला लज्जास्पद ! यात आणखी कुणकुणाचा सहभाग आहे, याचीही चौकशी करून सत्य जनसमोर आले पाहिजे !

दोषींवर कठोर कारवाई करून नवी मुंबईतील सर्व चर्चच्या अंतर्गत असलेल्या वसतीगृहांची चौकशी करावी !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून आरोपींवर कारवाई का करत नाहीत ?

हरिहरेश्‍वर (रायगड) येथे सापडलेल्या नौकेचा आतंकवादाशी संबंध नाही !  

श्रीवर्धनमधील हरिहरेश्‍वर (रायगड) येथे स्थानिक मासेमारांना १६ मीटर लांबीची दुर्घटनाग्रस्त नौका आढळली. नौकेत एके ५६ बनावटीच्या ३ रायफली, दारूगोळा, तसेच कागदपत्रे आढळून आली.

हिंदूंनी फाळणीच्या वेळचा सत्य इतिहास समजून घेऊन आत्मपरीक्षण करावे ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्कृती अभ्यासक

हिंदु जनजागृती समितीने ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’च्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘भारताच्या विभाजनाचा काळा इतिहास !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची ‘ध्वज संकलन’ मोहीम

राष्ट्रध्वजाचा चुकूनही अवमान होऊ नये, या हेतूने त्यांचे संकलन करण्याचा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा स्तुत्य कार्यक्रम !

‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाच्या अपयशामुळे अभिनेते आमीर खान निराश !

राष्ट्र आणि धर्म यांचा द्वेष करणार्‍या अभिनेत्यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालून त्यांना ‘जशास तसे’ उत्तर देणार्‍या राष्ट्र अन् धर्म प्रेमी प्रेक्षकांचे अभिनंदन ! हिंदुद्वेष्टे आमीर खान प्रेक्षकांनी शिकवलेल्या धड्यातून आता तरी हिंदुद्वेष करण्याचे सोडणार का ?

आरेतील जंगल वाचवण्याची राष्ट्रपतींकडे मागणी !

मेट्रोच्या नावाखाली आरे वसाहतीमधील जंगल नष्ट करून पर्यावरणाचा र्‍हास होऊ देऊ नये, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे केली आहे. यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.