इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची ‘ध्वज संकलन’ मोहीम

मुंबई – इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मुंबई विभागीय कार्यालयाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याच्या उद्देशाने १६ ऑगस्टपासून ‘ध्वज संकलन’ मोहीम हाती घेतली आहे.

(सौजन्य : ABP MAJHA)

‘भारतियांनी त्यांच्याकडचा राष्ट्रध्वज जवळच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरती आणून द्यावा. चांगल्या राष्ट्रध्वजांचे जतन केले जाईल, तर खराब ध्वजांची आदरपूर्वक विल्हेवाट लावली जाईल’, असे या संस्थेने म्हटले आहे. (राष्ट्रध्वजाचा चुकूनही अवमान होऊ नये, या हेतूने त्यांचे संकलन करण्याचा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा स्तुत्य कार्यक्रम ! – संपादक)