मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांचे प्रमाण अल्प करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याचे आदेश !

महामार्गावर अनेकांचे जीव गेल्यावर जागे होणारे प्रशासन काय कामाचे ? आतापर्यंत झालेल्या अपघातांच्या प्रकरणी संबंधित अधिकार्‍यांना उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला, तर रस्ते अपघातात सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात कुणीही हयगय करणार नाही !

विधानसभेच्या अधिवेशनासाठी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून पक्षादेश !

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून शिंदेगटात गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेविषयी सर्वाेच्च न्यायालयात खटला चालू आहे. असे असले तरी यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी भरतशेठ गोगावले यांना शिवसेनेचे पक्षप्रतोद म्हणून मान्यता दिली आहे.

भरूच (गुजरात) येथील कारखान्यावरील धाडीत ५१३ किलो अमली पदार्थ जप्त !

मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई; एका महिलेसह ७ आरोपींना अटक, संबंधितांना कठोर शिक्षा झाल्यासच अमली पदार्थ यंत्रणेचे जाळे उद्ध्वस्त होऊ शकेल !

मुंबई, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत व्याख्यानांद्वारे प्रबोधन !

स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम !

महाराष्ट्र शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातील १०० कोटी रुपयांचा घोटाळा १० वर्षांनंतरही चौकशीच्या फेर्‍यातच !

चौकशीविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेकडून सरकारकडे विचारणा !

मुंबईमध्ये उत्साहाच्या भरात अनेकांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान !

स्वातंत्र्यकाळात राष्ट्रध्वज पडू नये, यासाठी क्रांतीकारकांनी गोळ्या झेलल्या. स्वातंत्र्योत्तरकाळात राष्ट्रध्वजाचा अवमान होणे, हे नागरिकांमधील देशप्रेम उणावत चालल्याचे द्योतक आहे ! प्रत्येक भारतियाने क्रांतीकारकांसारखी कृतीशील देशभक्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवा !

खातेवाटप घोषित, मुख्यमंत्र्यांकडे १४, तर उपमुख्यमंत्र्यांकडे ८ खात्यांचे दायित्व !

महाराष्ट्रातील राज्यशासनाचे खातेवाटप १४ ऑगस्ट या दिवशी घोषित करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १४, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ८ खात्यांचे दायित्व असणार आहे.

स्वातंत्र्याच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रहितासाठी समर्पित होऊन कार्य करा !

फाळणीच्या वेळी हिंदू आणि भारतीय यांनी असंख्य कष्ट सहन केले. त्यांच्यामुळेच आज भारत संपूर्ण विश्‍वात नावारूपाला येत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण सर्वांनी शपथ घेऊया की, भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवूया.

गुंतवणूक क्षेत्रातील तज्ञ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

गुंतवणूक क्षेत्रातील तज्ञ आणि ‘शेअर बाजाराचे राजा’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (वय ६२ वर्षे) यांचे १४ ऑगस्टला निधन झाले.

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे (वय ५२ वर्षे) यांच्या गाडीला १४ ऑगस्ट या दिवशी पहाटे ५ वाजता झालेल्या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले.