अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित !

  • अवैध मद्यविक्रीला पाठीशी घातल्याचा ठपका

  • राज्यातील अवैध मद्यविक्रीच्या विरोधात विधानसभेत आमदार आक्रमक

पोलीस उपअधीक्षक सुनील जायबाय आणि पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे

मुंबई – अवैध मद्यविक्रीला पाठीशी घातल्याच्या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना शासनाने निलंबित केले. १८ ऑगस्ट या दिवशी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे पोलिसांच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे गुटखा, मटका, जुगार, तसेच मद्यविक्री यांचे अवैध धंदे चालू असल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वासुदेव मोरे यांच्या निलंबनासह कारवाई करण्यात अकार्यक्षम ठरल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक सुनील जायबाय यांचे अकार्यकारी पदावर स्थानांतर करण्याची घोषणाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

संपादकीय भूमिका

असे पोलीस असणे पोलीस दलाला लज्जास्पद ! यात आणखी कुणकुणाचा सहभाग आहे, याचीही चौकशी करून सत्य जनसमोर आले पाहिजे !