हरिहरेश्‍वर (रायगड) येथे सापडलेल्या नौकेचा आतंकवादाशी संबंध नाही !  

  • विधान परिषदेचे कामकाज !  

  • गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान परिषदेत निवेदन

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – १८ ऑगस्ट या दिवशी श्रीवर्धनमधील हरिहरेश्‍वर (रायगड) येथे स्थानिक मासेमारांना १६ मीटर लांबीची दुर्घटनाग्रस्त नौका आढळली. नौकेत एके ५६ बनावटीच्या ३ रायफली, दारूगोळा, तसेच कागदपत्रे आढळून आली. त्यांनी याविषयीची माहिती ‘भारतीय कोस्ट गार्ड’ आणि अन्य यंत्रणा यांना दिली. या नौकेचे नाव ‘लेडी हान’ असून तिची मालकी एका ऑस्ट्रेलियातील महिलेकडे आहे. ही नौका मस्कतहून युरोपकडे जाणार होती; मात्र नौकेचे इंजिन निकामी झाले. यानंतर कोरियन युद्धनौकेने त्यांतील प्रवाशांची सुटका केली. समुद्र खवळलेला असल्याने नौका बांधून किनार्‍यावर आणता आली नाही. ती समुद्रातून वहात हरिहरेश्‍वर येथे आली. त्यामुळे ‘हरिहरेश्‍वर (रायगड) येथे सापडलेल्या नौकेचा आतंकवादाशी संबंध नाही’, असे निवेदन गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘याचे पुढील अन्वेषण स्थानिक पोलीस आणि राज्य गुन्हे अन्वेषण पथक करत आहे. सध्या दहीहंडी, गणेशोत्सव पहाता ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे आणि सर्व ती काळजी घेण्यात येत आहे.’’