‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाच्या अपयशामुळे अभिनेते आमीर खान निराश !

अभिनेते आमीर खान यांच्या जवळच्या व्यक्तीची माहिती

‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाच्या अपयशामुळे अभिनेते आमीर खान निराश

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आमीर खान यांनी ४ वर्षांनी ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटातून पुनरागमन केले. ११ ऑगस्ट या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाला; पण प्रेक्षकांनी या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात बहिष्कार घातला. चित्रपट अयशस्वी ठरल्याने आमीर खान निराश झाले आहेत, अशी माहिती आमीर खान आणि त्यांची पहिली पत्नी किरण राव यांच्या जवळच्या व्यक्तीने दिली. ‘चित्रपटाच्या अपयशामुळे आमीर यांना मोठा धक्का बसला आहे. या चित्रपटासाठी त्यांनी पुष्कळ कष्ट घेतले होते. आता या अपयशाचे दायित्व त्यांनी स्वतः घेतले असून चित्रपट वितरकांना ते स्वतः हानीभरपाई देणार आहेत.’’

या चित्रपटाने त्याच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १२ कोटी रुपये कमाई केली, तर दुसर्‍या दिवशी केवळ ७ कोटी ५० लाख रुपये इतकीच कमाई होऊ शकली. काही ठिकाणी तर प्रेक्षकांअभावी चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचे खेळ रहित करण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • राष्ट्र आणि धर्म यांचा द्वेष करणार्‍या अभिनेत्यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालून त्यांना ‘जशास तसे’ उत्तर देणार्‍या राष्ट्र अन् धर्म प्रेमी प्रेक्षकांचे अभिनंदन ! 
  • सर्वच अभिनेत्यांनी या उदाहरणातून बोध घ्यावा, अन्यथा त्यांच्याही पदरी अपयश पडेल ! 
  • हिंदुद्वेष्टे आमीर खान प्रेक्षकांनी शिकवलेल्या धड्यातून आता तरी हिंदुद्वेष करण्याचे सोडणार का ?