ज्‍येष्‍ठ निरूपणकार आप्‍पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार घोषित !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथील त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन याविषयी त्‍यांची भेट देऊन सन्‍मान केला.

बोगस कामगारांच्‍या शोधार्थ शासन ‘अ‍ॅप’ सिद्ध करणार ! – डॉ. सुरेश खाडे, कामगार कल्‍याणमंत्री

कामगारांच्‍या मुलांना उच्‍च शिक्षण मिळावे, यासाठी प्रत्‍येक जिल्‍ह्यात वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्‍याचा प्रस्‍ताव सिद्ध करण्‍यात आला आहे.

९ मार्चला अर्थसंकल्‍प सादर होणार !

राज्‍याचा वर्ष २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्‍प ९ मार्च या दिवशी वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत सादर करणार आहेत. अंदाजे १५ मार्चपर्यंत अर्थसंकल्‍पीय अधिवेशन चालवले जाऊ शकते.

मिरज येथे २४ आणि २५ फेब्रुवारी या दिवशी कामगार साहित्‍य संमेलन ! – डॉ. सुरेश खाडे, कल्‍याण कामगारमंत्री

महाराष्‍ट्र विश्‍वकोष निर्मिती मंडळाचे अध्‍यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्‍या हस्‍ते संमेलनाचे उद़्‍घाटन होणार आहे, अशी माहिती कल्‍याण कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

निवडणूक आयोगाने लोकशाहीचे रक्षण करावे ! – उद्धव ठाकरे, शिवसेना

पक्षचिन्‍ह आणि पक्षाचे नाव यांविषयी सर्वोच्‍च न्‍यायालयाने निर्णय द्यावा. न्‍यायालयाच्‍या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय घेऊ नये. पक्षांतर्गत घटनेचे आम्‍ही पालन केले आहे.

‘गोबेल्‍स’ नीतीचा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’ला राष्‍ट्रभक्‍तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, सनातन संस्‍था

‘बीबीसी’च्‍या ‘डॉक्‍युमेंट्री’मध्‍ये मोदीजींवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण केले आहे. हे प्रश्‍नचिन्‍ह केवळ मोदींवर नसून भारताच्‍या जनतेवरही आहे; कारण भारतीय जनतेने मोदीजींना निवडून दिले आहे.

प्रवाशांच्या तक्रारी नोंदवण्यासाठीची सदोष ऑनलाईन यंत्रणा राज्यशासन दुरुस्त करणार !

परिवहन आयुक्त कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालये येथील तक्रार निवारण प्रणाली अन् ‘मोबाईल ॲप’ यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी राज्यशासनाने एका वर्षासाठी २२ लाख ७४ सहस्र ६५७ रुपये संमत केले आहेत, तसेच हे हाताळण्याचे दायित्व ‘महाआयटी’कडे देण्यात आले आहे.

१० फेब्रुवारीला मुंबईत होणार ‘वंदे भारत’ ट्रेनचे उद्घाटन !

पंतप्रधानांच्या मुंबई दौर्‍याच्या वेळी ड्रोन, पतंग आदी उडवण्यावर बंदी ! ९ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून १० फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्देश लागू असणार आहेत.

धारावी येथील पोलीस निरीक्षक प्रदीप सालेकर यांची पदावरून उचलबांगडी !

कर्तव्‍यचुकार पोलिसांची पदावरून उचलबांगडी करणे पुरेसे नसून त्‍यांना बडतर्फ करून कारागृहात डांबणे आवश्‍यक !

क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्‍यावर मारहाणीचा गुन्‍हा नोंद

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्‍यावर पत्नीला मारहाण केल्‍याचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. कांबळी यांची पत्नी अँड्रिया यांनी या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केली होती.