निवडणूक आयोगाने लोकशाहीचे रक्षण करावे ! – उद्धव ठाकरे, शिवसेना

शिवसेनेचे नेते आणि माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई – पक्षचिन्‍ह आणि पक्षाचे नाव यांविषयी सर्वोच्‍च न्‍यायालयाने निर्णय द्यावा. न्‍यायालयाच्‍या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय घेऊ नये. पक्षांतर्गत घटनेचे आम्‍ही पालन केले आहे. आयोगाने लोकशाहीचे रक्षण करावे, असे वक्‍तव्‍य शिवसेनेचे नेते आणि माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केले. ते पुढे म्‍हणाले, ‘‘सर्वोच्‍च न्‍यायालयावर अंकुश ठेवला जाणे, हे आरोग्‍यदायी लोकशाहीचे लक्षण नाही. आयोगाच्‍या सूत्रांची पूर्तता करूनही  आमच्‍या शपथपत्रावर आक्षेप घेतला. ज्‍या शिंदे गटाने शिवसेनेवर दावा सांगितला आहे, त्‍यांना शिवसेनेची घटना मान्‍य नाही.’’