मिरज येथे २४ आणि २५ फेब्रुवारी या दिवशी कामगार साहित्‍य संमेलन ! – डॉ. सुरेश खाडे, कल्‍याण कामगारमंत्री

मध्यभागी कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – सांगली जिल्‍ह्यातील मिरज येथील बालगंधर्व नाट्यमंदिर येथे २४ आणि २५ फेब्रुवारी या दिवशी १७ वे राज्‍यस्‍तरीय कामगार साहित्‍य संमेलन होणार आहे. ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक डॉ. तारा भवालकर यांची संमेलनाच्‍या अध्‍यक्षपदी निवड करण्‍यात आली आहे. महाराष्‍ट्र विश्‍वकोष निर्मिती मंडळाचे अध्‍यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्‍या हस्‍ते संमेलनाचे उद़्‍घाटन होणार आहे, अशी माहिती कल्‍याण कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.