मालाड (मुंबई) येथील झोपडपट्टीला लागलेल्‍या आगीत एका मुलाचा मृत्‍यू !

प्राथमिक माहितीनुसार सिलेंडरचा स्‍फोट होऊन आग लागल्‍याचे प्राथमिक अनुमान आहे. या आगील अनुमाने ५० झोपडपट्ट्या जळून खाक झाल्‍या आहेत.

‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयी आयआयटी, पवई येथे कार्यशाळा

उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दिष्ट गाठण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भारतातील अतीउष्णतेच्या लाटेशी संबंधित कार्यक्रमाची कार्यवाही, समन्वय आणि मूल्यमापनासाठी कृती आराखडा सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अनधिकृत ‘मोबाईल टॉवर्स’ना नोटिसा !

महापालिकेची अनुमती न घेता बाजार समिती आणि व्यापारी यांनी काही ठिकाणी गाळ्यांवर अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारले आहेत.

आरे परिसरात हिंदूंच्या मोर्च्यात पोलिसांचा लाठीमार

येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने राममंदिराच्या शेजारी कब्रस्तानला जागा देण्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यावर पोलिसांनी लाठीमार केला. मोठ्या संख्येने हिंदु धर्माभिमानी भगवे ध्वज आणि फलक घेऊन येथे आले होते.

खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात रुग्णखाटांची संख्या दुप्पट केली !

कर्करोग रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात रुग्ण खाटा आणि त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी मारुति मोरे

श्री. मारुति मोरे हे मुंबई महापालिका मुख्यालयात गेल्या २२ वर्षांपासून वृत्तसंकलन करीत आहेत. त्यांचे माजी महापौर, सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक, अधिकारी वर्ग यांच्याशी चांगले संबंध आहेत.

पनवेल येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त वाहनफेरी !

धर्मप्रेमींच्या घोषणांमुळे वातावरण उत्साहवर्धक !

‘वंदे भारत’ रेल्‍वे महाराष्‍ट्र आणि मुंबई यांसाठी यशस्‍वी पाऊल ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

महाराष्‍ट्रात रेल्‍वेचे सर्वांत मोठे जाळे आहे. मागील काही वर्षे रेल्‍वे विभाग दुर्लक्षित होता; मात्र पंतप्रधान मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्रशासनाने रेल्‍वेसाठी सर्वाधिक निधी दिला आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते मुंबईत ‘वंदे भारत’ रेल्‍वेचे लोकार्पण !

‘वंदे भारत’ च्‍या लोकार्पणानंतर सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार भुयारी मार्ग यांचेही पंतप्रधानांच्‍या हस्‍ते लोकार्पण होईल. दुपारी ४.३० वाजता पंतप्रधान ‘अल्‍जामिया-तुस-सैफियाह’ या परिससरातील विकासकामांचे उद़्‍घाटन करणार आहेत.

ज्‍येष्‍ठ निरूपणकार आप्‍पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार घोषित !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथील त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन याविषयी त्‍यांची भेट देऊन सन्‍मान केला.