The One And Only RATAN TATA : उद्योगापेक्षा देशाला प्राधान्य देणारे एकमेवाद्वितीय रतन टाटा !

टाटा उद्योग समूहाचे प्रमुख पद्मविभूषण रतन टाटा यांनी ९ ऑक्टोबरच्या रात्री शेवटचा श्वास घेतला. ते या देशाला लाभलेले अनमोल असे रत्नच होते. देशावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगी टाटा घेतलेले काही राष्ट्रहितैषी निर्णय येथे देत आहोत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११ मुख्याधिकार्‍यांच्या नियुक्त्या !

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कारणास्तव रिक्त असलेल्या महाराष्ट्रातील ११ नगर परिषदांच्या मुख्याधिकार्‍यांच्या ९ ऑक्टोबर या दिवशी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे दुर्गापूजेस मुसलमानांचा विरोध !

धर्मनिरपेक्ष आणि हिंदूबहुल असणार्‍या भारतात दुर्गापूजेस विरोध होणे संतापजनक !

राज्याच्या मंत्रीमंडळातील निर्णय ‘एस्.एम्.एस्.’द्वारे नागरिकांपर्यंत पोचवणार !

राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये होणारे निर्णय अधिकाधिक जनतेपर्यंत पोचावेत, यासाठी यापुढे भ्रमणभाष संदेशाद्वारे हे निर्णय नागरिकांना पाठवण्यात येणार आहेत.

बसस्थानक आणि आगारे यांचा खासगी माध्यमातून पुनर्विकास करणार !

एस्.टी.च्या जागा खासगी आस्थापनांना भाडेतत्वावर देऊन एस्.टी.ला उत्पन्न मिळावे, यादृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. एस्.टी. स्थानक आणि आगार येथे विमानतळासारखे वातावरण निर्माण करण्यात येईल, तसेच तेथे खरेदीही करता येणार आहे.

धनगर कार्यकर्त्यांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवरच उड्या !

राज्यात धनगर आरक्षणाच्या समस्येवर तोडगा निघत नसल्याने धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात आंदोलन केले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप :  सायबर चोरांना पोलिसांचा दणका !; आयफोन चोरणार्‍या मुसलमानाला अटक !

पोलिसांनी फसवणूक करणार्‍यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा केल्यावरच असे प्रकार अल्प होतील !

रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची काँग्रेसची मागणी

ही मागणी काँग्रेसकडून यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याविषयी ७ ऑक्टोबर या दिवशी नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला स्मरणपत्र पाठवले आहे.

भाऊबीजेनिमित्त अंगणवाडी सेविकांना २ सहस्र रुपये ओवाळणी !

आदिती तटकरे म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रातील अंगणवाडी ताई आपल्या बालकांचे, गरोदर मातांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्याही सक्षम करण्यासाठी राज्यशासनाच्या वतीने हा निर्णय घेतला आहे.’’

मागील ६ वर्षांत महाराष्ट्रातील ९६ सशस्त्र माओवाद्यांचा खात्मा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे माहिती सादर