मागील ६ वर्षांत महाराष्ट्रातील ९६ सशस्त्र माओवाद्यांचा खात्मा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे माहिती सादर

अभिजात भाषेचा दर्जाच्या कार्यवाहीविषयी मराठी भाषा विभाग मार्गदर्शन घेणार !

मराठी भाषाभवनाच्या बांधकामाच्या शुभारंभानंतर मराठी भाषा विभागाकडून अभिजात भाषेच्या दर्जाविषयी मराठी भाषा विभाग केंद्रशासनाशी समन्वय करणार असल्याची मराठी भाषा विभागाच्या अधिकार्‍यांनी माहिती दिली.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : माहीम येथे रहिवासी इमारतीला आग !; चोराने टेंपोतून अडीच लाख रुपये पळवले !

माहीम येथे रहिवासी इमारतीला आग ! माहीम – येथील रहिवासी इमारतीला ७ ऑक्टोबरच्या पहाटे भीषण आग लागली. आग लागल्याचे कळताच इमारतीतील रहिवाशांनी तातडीने बाहेर धाव घेतली. अग्नीशमन दलाच्या सैनिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कुणीही घायाळ झाले नाही. चोराने टेंपोतून अडीच लाख रुपये पळवले … Read more

अटल सेतू जड वाहनांसाठी लोकप्रिय मार्ग !

घाडगे यांच्या मते, पुलाचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने खासगी चारचाकींसाठी पथकराच्या शुल्कात ४० टक्क्यांची कपात करावी आणि टॅक्सी अन् खासगी कॅब सेवांसाठी पथकर माफ करावा.

मराठी भाषेला अभिजात दर्जा हा सर्वांसाठी सुवर्णक्षण ! – पंतप्रधान

पंतप्रधानांचे आभार मानण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने ‘अभिजात मराठी सन्मान सोहळ्या’चे आयोजन !

थोडक्यात महत्त्वाचे

प्लास्टिकच्या कचर्‍याचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता सरकारने पुन्हा एकदा प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र करायला हवी !

६ ऑक्टोबरला १० घंट्यांचा ‘मेगा ब्लॉक’

पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेच्या जोड कामांसाठी गोरेगाव ते कांदिवली या दरम्यान १० घंट्यांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

भायखळा येथे अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची हत्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) भायखळा विधानसभा मतदारसंघाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी तथा मुन्ना (वय ४५ वर्षे) यांची ४  ऑक्टोबरच्या मध्यरात्री हत्या करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात महिलेवर बलात्कार !

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी झाली वासनांधांचे शहर !