The One And Only RATAN TATA : उद्योगापेक्षा देशाला प्राधान्य देणारे एकमेवाद्वितीय रतन टाटा !

टाटा उद्योग समूहाचे प्रमुख पद्मविभूषण रतन टाटा यांनी ९ ऑक्टोबरच्या रात्री शेवटचा श्वास घेतला. ते या देशाला लाभलेले अनमोल असे रत्नच होते. देशावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगी टाटा घेतलेले काही राष्ट्रहितैषी निर्णय येथे देत आहोत.

टाटा उद्योग समूहाचे प्रमुख पद्मविभूषण रतन टाटा !

१. देशविरोधी विधान करणार्‍या आमीर खान यांच्याशी सडेतोड व्यवहार !

‘वर्ष २०१६ मध्ये अभिनेता आमीर खान यांनी देशविरोधी विधान केले होते. त्यानंतर टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी स्वत: संस्थेच्या करण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या विज्ञापनांमधून आमीर खान यांना काढून टाकले.

२. जेएनयूतील व्यक्तीला संस्थेत काम न देण्याच निर्णय !

देहलीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएनयू) घडलेल्या देशद्रोही घटनांमुळे दुखावलेले रतन टाटा यांनी त्यांच्या सर्व संस्थांमध्ये यापुढे जेएनयूतील व्यक्तीला काम न देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

३. पाकिस्तानी ठेकेदाराला काडीचीही किंमत न देणे

मुंबईतील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणानंतर टाटा समूहाचे असलेल्या ‘ताज हॉटेल’ने इतर सर्व ताज हॉटेलांच्या नूतनीकरणासाठी देश-विदेशातून निविदा मागवल्या होत्या. अनेक देश-विदेशातील आस्थापनांनी यासाठी टाटा समूहाकडे अर्ज केले होते. त्यात २ पाकिस्तानी आस्थापनांचाही समावेश होता. कसेही करून ही निविदा आपल्यालाच मिळाली पाहिजे, असे त्या पाकिस्तानी ठेकेदारांचे प्रयत्न होते. त्यासाठी ते भारतातील टाटा समूह संस्थेच्या मुख्य कार्यालयात संचालकांना भेटायला गेले. तेव्हा रतन टाटा यांनी त्यांना संपर्क करण्याची संधीच दिली नाही. या कार्यालयाच्या आवारात घंटोन्‌घंटे बसूनही कोणाचेही बोलावणे न आल्यामुळे शेवटी पाकचे ठेकेदार कंटाळून देहलीला निघून गेले.

४. देशद्रोह्यांना निविदा न देण्याचा निर्णय !

देहलीला गेल्यावर त्यांनी तत्कालीन केंद्र सचिवांकडे टाटा यांच्या विरोधात तक्रार नोंदवून ‘त्यांना भेटण्याची संधी मिळवून द्यावी’, अशी विनंती केली. त्यांच्या बोलण्यासमोर मान तुकवून संबंधित अधिकार्‍याने रतन टाटा यांना दूरभाष केला आणि ‘त्यांनाच (पाकच्या ठेकेदारांनाच) निविदा द्यायला हवी’, अशी ताकीद दिली. यावर टाटा म्हणाले, ‘‘तुम्हाला मान-मर्यादा आणि देशप्रेम नसेल; पण आम्हाला आहे. ही निविदा कोणत्याही प्रकारे त्या देशविरोधी आणि आडदांडांना मी देऊ शकत नाही.’’ हे उत्तर ऐकून त्या सचिवांचा तोंडवळा हिंग खाल्लेल्या माकडासारखा झाला असावा.

५. पाकला टाटा सुमो वाहन निर्यात न करणे

एकदा पाकिस्तान शासनाने टाटा यांना ‘तुम्ही आम्हाला टाटा सुमो वाहने (गाड्या) निर्यात करावीत’, असे स्वतःहून सांगितले होते. तथापि रतन टाटा यांनी हेतुपुरस्सर पाकला एकही वाहन पाठवले नाही. मनात आणले असते, तर तेव्हा टाटा समूह संस्थेने लाभ करून घेतला असता; पण रतन टाटा केवळ लाभ पहाणारे उद्योजक नाहीत. त्यांना उद्योगापेक्षा देश प्रिय आहे.

या उद्योजकाकडून या देशाच्या नागरिक, उद्योजक, राजकारणी, साहित्यिक, तसेच बुद्धी गहाण टाकलेल्या काही जिवांना पुष्कळ शिकण्यासारखे आहे, नाही का ?’

(संदर्भ : ‘मासिक मेरु’, मार्च २०१६)