जिल्‍ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्‍या कोल्‍हापूर जिल्‍हाधिकारी कार्यालयात उपस्‍थिती नोंदवण्‍यासाठी ‘बायोमेट्रिक’ व्‍यवस्‍थाच नाही !

कोल्‍हापूर जिल्‍ह्याच्‍या तुलनेत सांगली महापालिकेसारख्‍या तुलतेन अत्‍यंत लहान असलेल्‍या महापालिकेत ‘बायोमेट्रिक’ व्‍यवस्‍था आहे, इतकेच नाही, तर प्रत्‍येक वेळी कार्यालयातून आत-बाहेर जातांना ‘फेस रिडींग’द्वारे यंत्रावर नोंद करावी लागते.

अवेळी पावसाने उन्‍हाळ्‍यातच बीड बसस्‍थानक बनले तळे !

मागील ३ दिवसांत पडलेल्‍या वादळी वार्‍यासह अवेळी पावसाने येथील बसस्‍थानकाची अवस्‍था एखाद्या तळ्‍याप्रमाणे झाली आहे.

गोव्यात ४ वर्षांत बलात्काराची २९९ प्रकरणे; पण केवळ ३ प्रकरणांमध्ये गुन्हेगाराला शिक्षा !

हे एकूणच न्याययंत्रणेचे अपयश म्हणावे लागेल ! ‘उशिराने मिळालेला न्याय हा अन्यायच’, असे म्हटले जाते !

अत्‍यंत अस्‍वच्‍छता, मोकाट जनावरे, इमारतीची दुरवस्‍था यांसह अनेक समस्‍या असलेले अक्‍कलकोट बसस्‍थानक !

‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक प्रकरणी गोवा पोलीस आणि पर्यटन खाते यांची संयुक्त कारवाई

पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक करणार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई केल्यासच त्यांच्यावर वचक बसेल आणि हे प्रकार टळतील !

सोलापूर जिल्ह्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने शेतीपिकांची हानी !

सलग २७ आणि २८ एप्रिल या दिवशी वादळी वार्‍यासह झालेल्या अवेळी पावसामुळे विजेचे खांब अन् अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. अचानक आलेल्या पावसाने शेतीतील पिकांची मोठी हानी झाली.

मुंबई विद्यापिठातील मुलींच्या वसतीगृहात ८ मासांपासून पाणीच नाही !

मुलींच्या वसतीगृहात पाण्याची कमतरता असेल, तर पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. (८ मासांनंतर असे निर्देश देणार्‍या विद्यापीठ प्रशासनाचा गलथान कारभार !)

उत्तराखंड राज्यात १०० हून अधिक अवैध मशिदी आणि मदरसे यांची उभारणी !

इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम केले असतांना प्रशासन झोपले होते का ? कि संबंधितांनी ‘अर्थ’पूर्ण तडजोड केली आहे ? याची चौकशी करून सरकारने सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषी उत्तरदायी अधिकार्‍यांना आजन्म कारागृहात पाठवावे !

गोवा : टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरून काँग्रेसकडून जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्यांना घेराव

लोकांच्या आरोग्याशी खेळ ! गोव्यात पाणीपुरवठा करण्यासाठी वापरले जाणारे टँकर मलनिस्सारणासाठी वापरले जातात. त्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका उत्पन्न होत आहे, अशी भूमिका घेऊन काँग्रेसचा जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्याना घेराव !

पिंपरी (पुणे) महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील ‘ई क्लासरूम’ योजना बंदस्थितीत

महापालिकेच्या शाळांमध्ये संगणक, विज्ञान आणि गणित यांच्या वर्गखोल्या सिद्ध करण्यात आल्या. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रारंभीचे काही दिवस सोडल्यास अनेक तांत्रिक अडचणींमुळे ‘ई लर्निंग’ सध्या बंद पडल्याचे दिसून येत आहे.