सुराना (मध्यप्रदेश) येथील धर्मांधांवर कारवाई झाल्यानंतर हिंदूंकडून पलायन करण्याची चेतावणी मागे !

मध्यप्रदेशातील भाजप सरकारने हिंदूंवरील अत्याचारांची तात्काळ नोंद घेत कारवाई करून त्यांना आश्‍वास्त केल्यासाठी अभिनंदन.

तमिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यात हिंदू झाले आहेत अल्पसंख्यांक ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदुविरोधी वास्तव स्पष्टपणे प्रतिपादणार्‍या मद्रास उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! न्यायालयांनी अशा प्रकारे वास्तवाला धरून हिंदुविरोधी षड्यंत्रांना वाचा फोडल्यास समाजाला वास्तवाचे भान येऊन जागृती होण्यास साहाय्य होईल !

८ राज्यांतील अल्पसंख्यांक हिंदूंना ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळण्यासाठी केंद्राला उत्तर देण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत !

जनहित याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

पाकच्या सिंधमध्ये हिंदु व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

पाकच्या सिंध प्रांतातील अनाज मंडी भागामध्ये ४४ वर्षीय हिंदु व्यावसायिक सुनील कुमार यांची अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.

पाकिस्तान सरकारकडून पहिल्यांदाच हिंदूंच्या मंदिरांच्या देखभालीसाठी ‘हिंदु मंदिर व्यवस्थापन समिती’ची स्थापना

अशी समिती स्थापून पाकमधील हिंदूंच्या मंदिरांवर जिहादी करत असलेली आक्रमणे बंद होणार आहेत का ? ‘आम्ही अल्पसंख्य हिंदूंसाठी काही तरी करतो’, असे आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवण्यासाठीच पाक अशा समितीची स्थापना करत आहे !

पाकमधून ७ सहस्र नागरिकांचा भारताची नागरिकता मिळण्यासाठी अर्ज ! – केंद्र सरकारची माहिती

वर्ष २०१६ ते २०२० या काळात ४ सहस्र १७७ विदेशी लोकांना भारताची नागरिकता देण्यात आली, तर १० सहस्र ६३५ अर्ज प्रलंबित आहेत.

काश्मीरमधून कलम ३७० रहित केल्यानंतर एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही ! – केंद्र सरकार

कलम ३७० रहित केल्यापासून आतापर्यंत किती काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यात आले ?, किती जणांनी तेथे भूमी विकत घेतली ?, याचीही माहितीही सरकारने द्यावी, असे हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणांत मंदिरांची तोडफोड आणि बलात्काराच्या घटना झाल्याच नाहीत !’ – बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्री

बांगलादेश सरकार स्वतःची लाज राखण्यासाठी अशा प्रकारचा खोटा दावा करत आहे, हे सांगायला कोणत्याही तज्ञांची आवश्यकता नाही. जे जगाने पाहिले आहे, त्याला थेट नाकारणे हा खोटारडापणाच आहे.

देहली येथे घरी पूजा करतांना घंटी आणि शंख वाजवल्याने शेजारील धर्मांधांकडून हिंदु कुटुंबाला ठार मारण्याची धमकी !

अल्पसंख्यांकांच्या लोकसंख्येत वाढ झाल्यावर बहुसंख्य हिंदूंच्या संदर्भात जे घडत आले आहे, तेच या घटनेतही झाले, हे लक्षात घ्या !

बांगलादेशमध्ये गेल्या ४० वर्षांत हिंदूंच्या लोकसंख्येत ५ टक्के घट !

गेल्या ४ दशकांत याकडे लक्ष न देणार्‍या भारतातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद ! आता तरी सरकार बांगलादेशातील हिंदूंसाठी काही करणार का ? असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !