|
नवी देहली – जिथे हिंदू अल्प आहेत, तेथे राज्यशासन त्यांना अल्पसंख्यांक घोषित करू शकतो, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर जर देशभरात जिल्हानिहाय लोकसंख्या पाहिली, तर देशातील १०२ जिल्ह्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत. देशात सध्या ७७५ जिल्हे आहेत. जर या हिंदूंना अल्पसंख्य घोषित करण्यात आले, तर हिंदूंना अल्पसंख्यांक म्हणून असणारे लाभ मिळू शकतील.