महाराष्ट्रातील ४१९ तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासंदर्भात प्रस्ताव संमत !  

महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासंदर्भातील प्रस्ताव ग्रामविकास विभागाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत आणला होता. या खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्येक तीर्थक्षेत्रासाठी ५ कोटी रुपयांचे प्रावधान सुचवले होते. मंत्रीमंडळाने त्यास मान्यता दिली.

महाराष्‍ट्राला दिशा देणारे मराठी साहित्‍य संमेलन अमळनेर (जळगाव) येथे होईल ! – मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

७२ वर्षांनंतर अमळनेर येथे मराठी साहित्‍य संमेलन होत आहे. यातून विविध विषयांवर मंथन होईल. यामुळे हे संमेलन महाराष्‍ट्राला दिशा देणारे ठरेल, असा विश्‍वास राज्‍याचे मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्‍यवस्‍थापन मंत्री अनिल पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या अध्‍यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड !

९७ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या अध्‍यक्षपदी येथील डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्‍या महामंडळाच्‍या बैठकीत संमेलनाध्‍यपदी शोभणे यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले.

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे होणार !

९७ वे साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार आहे. साहित्य महामंडळाच्या पुणे येथील बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सनातन संस्‍थेच्‍या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

या प्रदर्शनामध्‍ये शास्‍त्रोक्‍त भाषेत लिहिलेले अध्‍यात्‍म, राष्‍ट्र आणि धर्म, आयुर्वेद, धर्माचरण इत्‍यादी विषयांवरील ग्रंथ ठेवण्‍यात आले होते. तसेच मराठी भाषेवरील अद्वितीय ग्रंथही या प्रदर्शनात उपलब्‍ध होते.

संमेलनातील परिसंवादांकडे पाठ फिरवणार्‍या दर्शकांचा नेते आणि कलावंत यांना पुष्‍कळ प्रतिसाद !

संमेलनामध्‍ये विविध विषयांवरील परिसंवाद आयोजित केले होते. याला १०० ते १५० लोक उपस्‍थित असल्‍याचे दिसत होते. दुसरीकडे चित्रपट कलावंत आणि राजकीय नेते यांच्‍या उपस्‍थितीला प्रचंड प्रतिसाद मिळत होता.

साहित्‍य संमेलनात वर्धा जिल्‍ह्यातील २३५ पुस्‍तकांचे प्रकाशन

वर्धा जिल्‍ह्यातील लेखक आणि साहित्‍यिक यांना न्‍याय देण्‍यासाठी येथील अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनामध्‍ये एक विशेष दालन उभारण्‍यात आले होते. या दालनामध्‍ये वर्धा जिल्‍ह्यातील विविध भागांतील ८४ लेखकांची २३५ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन मारामार्‍या होऊ नयेत; म्‍हणून वाचन केले पाहिजे ! – नागराज मंजुळे, दिग्‍दर्शक

गेल्‍या ६० वर्षांत पुष्‍कळ कविता-कादंबर्‍या झाल्‍या. त्‍यापेक्षा झाडे लावली, तर ते आपल्‍याला प्राणवायू देतात. वलयांकित माणसे आपल्‍याला अन्‍न-पाणी देत नाहीत. त्‍यामुळे झाडे जपली पाहिजेत, असे विधान अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्‍हटले. यावर चित्रपट दिग्‍दर्शक नागराज मंजुळे यांनी प्रत्‍युत्तर दिले.

मराठी साहित्‍य संमेलनाची दिशा ?

आपण या समाजाचे देणे लागतो, ही जाणीव अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात असणे, हे जिवंतपणाचे लक्षण आहे; मात्र सध्‍याच्‍या संमेलनाच्‍या भव्‍यतेत महत्त्वाच्‍या गोष्‍टी विसरत आहोत, असे जाणवते.

दर्जेदार साहित्यासाठी साहित्यिकांच्या पुस्तकांविना पर्याय नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या नीतीमुळे सर्व उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान यांवर आधारित शिक्षण  हे मराठीत देता येणार आहे. ती ज्ञान भाषा आहे.